पेट्रोल पंपावर फसवणूक करण्यासाठी कोणत्या tricks वापरतात जाणून घ्या. Know the tricks used to deceive the petrol station.

 पेट्रोल पंपावर फसवणूक करण्यासाठी कोणत्या tricks वापरतात जाणून घ्या. 

Know the tricks used to deceive the petrol station.



    प्रत्येक माणसाला रोज कोणत्याना कोणत्या समस्यांना सामोरं जावंच लागतं . त्यात दैनंदिन जीवनातील एखादी समस्या असेल तर अजूनच त्रास होतो. सध्या डिझेल पेट्रोल चे भाव गगनाला भिडलेले असताना अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीच्या बातम्या समोर येत आहेत परंतु हे पेट्रोल कसे चोरले जाते हे मात्र कोणालाच माहित नाही. तर  आज तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहे.  

ग्राहकांना फसवण्यासाठी पेट्रोल पम्पवाले काही पद्धती वापरतात. 

  • The Diversionary Trick
  • The Sleight of Hand, Shortchanging Trick
  • The long hose
  • The double start Trick
  • The Jerky Stop Start Trick
  • The continuity Trick
  • Dispensner Tampering Trick 

१. The Diversionary Trick


The Diversionary Trick म्हणजे साधारणतः तुम्ही पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाता , तुम्ही विशिष्ट रुपयाचे पेट्रोल भरण्यासाठी त्या व्यक्तीला सांगता परंतु त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला बोलण्यात गुंतवते आणिह्याचा फायदा घेऊन पेट्रोल टाकणारा व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या किमतीचे पेट्रोल न टाकता अगोदरच पेट्रोल टाकण्याचा पाईप बाजूला करून तुम्हाला पेट्रोल भरून झाले असे सांगतो. 

याचाच अर्थ असा कि तुम्ही ३०० रुपयाचे पेट्रोल टाकायला सांगितले परंतु तुमचे लक्स नसताना त्याने २५० रुपयाचे पेट्रोल टाकून मोकळा झाला. 

२. The Sleight of Hand, Shortchanging Trick

The Sleight of Hand, Shortchanging Trick मध्ये खरंतर आपलीही फार मोठी चूक असते.  कधी कधी आपण फार गडबडीत  अशा वेळी आपण पेट्रोल भरणाराला ४००-५०० रुपयाचे पेट्रोल भरायला सांगतो परंतु पेट्रोल भरून झाल्यानंतर पम्पवला आपल्याला सुट्टे पैसे नसल्याचं सांगतो अशा वेळी आपण बऱ्याचवेळा १०-२० रुपये कमी दिले चालतील परंतु लवकर दे म्हणून निघून जातो.
ह्याउलट कधी कधी आपण घाईत असल्याचे समजताच पंपावला आपल्याला उरलेल्या पैशांपैकी कमी पैसे देतो आणि आपण ते न मोजतात तिथून निघून जातो. त्यामुळे कधीही पैसे परत घेतांना मोजून घेतले पाहिजेत. 

३. The Diversionary Trick


The Diversionary Trick हि माझ्यासोबतही झालेली आहे. एकदा मी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी सकाळी सकाळी साडेपाच वाजता गेलो होतो. मी त्या दिवशीचा पहिलाच ग्राहक होतो. पेट्रोलवल्याने जशी मशीन चालू करून पाईप सोडला तास प्रत्येक्ष पेट्रोल टाकीत पडण्या अगोदरच ४०-५० रुपये बिल झालेलं दाखवत होतं. कारण पंपापासून टाकीपर्यंत  लांब पाईप असतो त्यामध्येच बराच पेट्रोल बसत असतं. परंतु त्याचे पैसेही आपल्यालाच द्यावे लागतात. म्हणून ह्या ट्रीक्सचं नाव आहे The Diversionary Trick. म्हणजेच लांब नळी . 


४. The double start Trick

The double start Trick हि ट्रेकस फार चतुराईने केली जाते. तुम्ही त्या व्यक्तीला २००० रुपयाचे पेट्रोल टाकायला सांगणार त्यावर  व्यक्ती व्यवस्थित न ऐकल्याचं कारण सांगून १३०० रुपयाचे पेट्रोल भरणार आणि जर तुमच्या लक्षात आलेच तर परत भरण्यासाठी पाईप आत घालणार परंतु त्यातही तो गडबड करून १७००-१८०० रुपयापर्यंतच पेट्रोल तुमच्या गाडीच्या टाकीत टाकणार. 
ह्या ट्रिक मध्येसुद्धा त्यांना त्यांचे साथीदार मदत करत असतात. 

५. The Jerky Stop Start Trick



तुम्ही कधी कधी बघत असता कि पेट्रोल भरताना व्यक्ती आपल्या बोटाखालील नॉब कमी जास्त करत असतो त्यावेळी तो पेट्रोल भरण्याची स्पीड कमी जास्त करत असतो त्यामुळे पेट्रोल भरताना मध्ये गॅप राहून थोडं थोडं पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न होत असतो. 

६. The continuity Trick


The continuity Trick ह्या ट्रिक मध्ये पेट्रोल भरणारा व्यक्ती तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत असतो. तुमच्या समोरील व्यक्तीने जर आपल्या गाडीत कमी पैशाचे पेट्रोल टाकले असेल तर ती व्यक्ती त्याच मीटरपासून सुरुवात करते आणि अगोदरच्या व्यक्तीने टाकलेल्या पेट्रोलच्या पैशा एव्हढे कमी पेट्रोल तुमच्या गाडीत टाकते ह्यालाच The continuity Trick म्हणतात. 

७. Dispensner Tampering Trick

Dispensner Tampering Trick हि अगोदरच्या वेळी फार व्हायची परंतु सध्या ह्याचा धोका कमी झालेला आहे. साधारणतः ह्या मध्ये मशीनमध्ये सेटिंग केली जाते

मित्रानो वरील माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि हि माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींनाही सांगा जेणेकरून त्यांची आणि आपली फसवणूक होणार नाही काळजी घेतली जाईल. 

और नया पुराने