मराठी

मी तुझ्या आहे 
मी तुझाच राहीन ग 
माझे प्राणप्रिये तुला 
हे प्राणही वाहीन ग 

तूच माझी गोडी 
तूच माझी भक्ति 
तू जिंकण्याची आशा 
तू जिंकण्याची शक्ति 

मी गेलो जरी परप्रांति 
माझ्या मुखी तूच असती 
म्हणूनच मला सखे 
सारेजन हसती 

मी त्याग करिन सर्वांचा 
सखे फ़क्त तुझ्यासाठी 
माझ्या प्राणाहून प्रिये 
ये माझ्या मीठी 
और नया पुराने