पीळ देऊन पोटाला
लेकराच्या मुखी घास देइ
एवढी सहनशीलता तुझ्या अंगी
कोठून आली सांगना आई
आपल्या चिमुकल्या पिलांना
चारा शोधते चिऊताई
मनी काळजी पिलांची
क्षणभरत परत येई
गोठ्यात वासर सोडून
रानी चराया जातात गाई
परत पुन्हा सांजवेळी
गोठ्याकडे निघतात घाई घाई
वनरनिला आपल्या पिल्लांची
किती वाटते नवलाई
घट्ट धरुनि उराशी
झाडावर झेप घेई
किती गावावे गोडवे
अहो आईच्या मायेचे
साऱ्या देवाहुन आधी
स्थान आहे हो आईचे
लेकराच्या मुखी घास देइ
एवढी सहनशीलता तुझ्या अंगी
कोठून आली सांगना आई
आपल्या चिमुकल्या पिलांना
चारा शोधते चिऊताई
मनी काळजी पिलांची
क्षणभरत परत येई
गोठ्यात वासर सोडून
रानी चराया जातात गाई
परत पुन्हा सांजवेळी
गोठ्याकडे निघतात घाई घाई
वनरनिला आपल्या पिल्लांची
किती वाटते नवलाई
घट्ट धरुनि उराशी
झाडावर झेप घेई
किती गावावे गोडवे
अहो आईच्या मायेचे
साऱ्या देवाहुन आधी
स्थान आहे हो आईचे