खऱ्या मित्राच्या शोधात

 
तिलाही वाटत 
कोणी माझ्याकडे पाहावं 
माझा खरा मित्र बनून 
माझ्या सहवासात राहावं 

नटून थटून येते ती 
खऱ्या मित्राच्या शोधात 
खरा मित्र असतो मात्र 
तो त्याच्याच नादात 

इकडून न्याहाळणारे 
ते खरे मित्रच नसतात 
त्यांचा धंदा असतो मैत्रीचा 
त्या मात्र त्यातच फसतात 

खरा मित्र खराच असतो 
तो कोणाला न्याहाळत नसतो 
मैत्री या शब्दावर 
त्याचा विश्वासच नसतो 

खरा मित्र हा एकदा 
ठेचाळलेला असतो 
मैत्री या शब्दानेच त्याला 
धोका दिलेला असतो 
और नया पुराने