भारतावर पुन्हा एकदा
आक्रमण केले
म्हणूनच सारेजण
शक्तिहीन झाले
इंग्रज, फ्रेंच आले
ते दिसले सर्वांना
आता जे आले
त्याची जाणंही होईना
ते समोर होते म्हणून
युद्ध खेळले त्यांच्यासोबत
आजचा माणसात घुसला
काय कराल त्याच्याबाबत ?
याला पळवून लावण्यासाठी
स्वतःला गोळी माराल का ?
आजच्या भारताला
स्वतंत्र तुम्ही करसाल का?
आज काल याचा
खूप चालला अत्याचार
हा परकीय आहे
भ्रष्टाचार भ्रष्टाचार