कवी

ती असेल जरी कोकिळा तिचा सूर मात्र मीच आहे मी कवी झालो तिच्यामुळे माझी ओळही तीच आहे ती असेल जरी विचारी तिचा विचारही मीच आहे मी असेल ध्यानस्त ऋषी माझी तपश्चर्याही तीच आहे तिचे कोमल , सुंदर रूप वेड लाविते या इ\जीवाला तिचे दिसताच नाजूक ओठ भुलविते या मनाला मलाही समजतात तुझ्या सर्व अडचणी एकदा विश्वास ठेऊन पहा त्या अडचणींवरही फिरविन पाणी मला तुझा हात हवाय तुझं आणखी काही नको मी प्रयत्न करतो विचारण्याचा एकदा नकार देऊ नको तू नकार जरी दिला तो तुझा होकार मानतो त्या शब्दामधूनच तुझ्या माझ्या कविता विणतो 


और नया पुराने