गरिबीतल्या गरिबांना गरिबी एक पीडा आहे
गरिबांना आतून आतून पोखरणारा किडा आहे
गरिबीपायीच गरीब लोक काहीतरी शिकतात
गरिबीच्याच झाडाला गोड फळे पिकतात
गरिबी हि गरिबांना चक्रव्यूव्ह असतो
एकजण निघतो सलामत तर दुसरंजन फसतो
गरिबीमुळेच गरीब लोक जगायलाही शिकतात
हुशारीने या जगाशी वागायलाही शिकतात
गरिबीचं गरिबांना कष्ट करायला शिकवते
गरिबीचं कोणाकोणाला प्राणालाही मुकवते
"गरिबी हटाव " म्हणणारेही खूप इथे असतात
गरिबीच्या तोंडाला तेच काळ फासतात .