अरे जीवना जीवना

अरे जीवना जीवना तुझा आहे कसा रंग 
तृप्त कोण तुझ्यासंग , आहे आज 

एक क्षणी तूच मला , आनंदाची वर्षा देई 
मग दुःख सागरात नेई , दीर्घ काळ 

आज सांग सांग मला, तुझा व्यवहार कसा 
माणूस जाळितो माणसा , भरदिवसा 

का तूच केला न्याय , माझ्याही जीवनाचा 
विरहात लोटण्याचा , मला सुद्धा 

नको नको असं करू , करू नको असं पाप 
प्रेम करणे इथे शाप , आहे का ?

करा करा हो निवाडा , तुम्ही करा आज न्याय 
नका करू अन्याय , माझ्यावरी 

अरे जीवना जीवना , तू निर्दयी आहे कसा 
माझा हि एक ठसा , असुदे कि 
और नया पुराने