एकीचे बळ

नको चिंता करू दादा 
तुम्हा नाही विसरणार 
तुमच्यासाठीच जगणार 
मी गडे 

शंका धरू नको मनी 
आहे राग थुंकून टाक 
हे हसतात सारी लोक 
आपणांवरी 

चार चौघे आहोत आपण 
एका घराचेच खांब 
का  राहता लांब लांब 
एकमेकांपासून 

चार चौघांचा जुडगा 
हे एकिचेच रे बळ 
कोणी करणार नाही छळ 
आपला गडे 

माईने शिकवलेत आम्हा 
सारे माणुसकीचे धडे 
माणूस माणसाच्या कामी पडे 
केंव्हा तरी 
और नया पुराने