तुला शुभेच्छा देण्याचा
मला अधिकारच नाही दिला
तू धोका देण्याआधीच
या जीवाचा घात झाला
तुझ्यावर प्रेम करताना
धोकेही सोसले असते
कमीत कमी तुझ्या प्रेमाचे
ऋण माझ्यावर राहिले नसते
प्रेमाचं ठेव दूर परंतु
तू माझा विचारही नाही केला
तुला बेवफा तरी म्हणावं कस
वेडा तुझ्यावर स्वतःच मेला
अजून नाही समजला तुला
खेळ माझ्या ह्या प्रेमाचा
आता वेळ आली आहे
तुझा ध्यास सोडण्याचा
तुला विसरणंही सखे
हा माझा संघर्ष आहे
प्रयत्न केला तुला जिंकण्याचा
याचा मला हर्षच आहे
विसरणं हा शब्दपण प्रिये
माझ्या येत नाही ओठावर
दुःखाचा सागर ओलांडून
बसलो जाऊन मी बेटावर