तुला भेटणे.
जमावात ह्या तुला भेटणे साधत नाही
तुझा खुणेचा पैजण सुध्दा वाजत नाही
सकाळीच ये पुन्हा अंगणी फुले घेऊनी
स्वप्नामध्ये येउन नुसते भागत नाही
माझ्यावर आरोप जुना केलास काल तू
तुला अतासा हवा तसा मी वागत नाही
सवयीने करतेस वाहवा..कळते आता
दाद द्यायची तुझी तशीही दानत नाही
भेटतेस तू तेव्हा होतो वाद नव्याने
भांडायाला तुलाही कारण लागत नाही
कवी- मधुसुदन नानिवडेकर
( प्रसिद्ध गझलकार)