प्रत्येकाच्याच मनात

प्रत्येकाच्याच मनात 

प्रत्येकाच्याच मनात असतात 
पापणी ओली करणाऱ्या आठवणी 
आग असते डोळ्यामध्ये 
आणि गालावर वाहतं पाणी 

 प्रत्येकाच्याच मनात असतात 
जखमा खोलवर झालेल्या 
आपलं कोणाला मानलं तरी 
आपल्याच कोणी दिलेल्या 

प्रत्येकाचाच काळीज कोणासाठी 
कधीतरी तुटत असतं 
कोणी माझ्यासाठीही जगावं 
असं सतत वाटत असतं 

प्रत्येकाच्याच डोळ्यात असतं 
प्रेम कोणासाठी लपलेलं 
वाहून जातात स्वप्न तरी 
एखादं स्वप्न जपलेलं 

प्रेत्येकाच्याच ओठावर असतं 
स्मित हास्य फुललेलं 
अन प्रेत्येकाचच मन असतं 
कोणासोबततरी जुळलेलं 




और नया पुराने