सात रंगात रंगून गेलो
आठवतो तुझी माझी कहाणी
पाहीले होते स्वप्न जे भंगून ते गेले
आता गातो दुःखाची गाणी
सात स्वरांमध्ये न्हाहून गेलो
मी गातो तुझे गोडवे ग
तुझ्याचसाठी जगत होतो
किती संकट आले आडवे ग
सात समुंद्र ओलांडले मी
तुझ्या प्रेमाच्या भरात ग
तरी तुझी चाहूल नाही
परतून आलो घरात ग
सात जन्म घेऊन आलो
सखे फक्त तुझ्याच साठी ग
दैवंताने तुला जन्मा घातले
फक्त माझ्याच साठी ग
सात वार मी केली पूजा
तुझ्या आयुष्यासाठी ग
जीव माझा तुझ्यात दडला
देऊ शाप कशासाठी ग