( चाल :- वफा ना रास आई, तुझे ओ हरजाई )
तुझ्यासाठी सजणी हा जीव वेडा झाला ---------२
तुझ्यापासून दूर, कसा राहीन मी
असा विचार तू कसा केला ....... ।। धृ ।।
तुला पाहताक्षणी मला सखये
आठवण आली मला गुलमोहरांची
असा सागरकिनारा प्रेमाचा
का आठवण यावी लहरांची
मला सोबत ने, मला मिठीत घे
प्रेमात दुःखाचा वादळ आला ...... ।।१ ।।
प्रेमाचे बंध माझे साजणी
आज घट्ट झाले तुझ्या संगती
शतायुष्य लाभो या प्रीतीला
पूजा करूया दोघे बसून संगती
तू समजून घे, तू उमजून घे
प्रीत वसंत आज बहरला ........ ।। २।।
तुझ्यासाठी सजणी हा जीव वेडा झाला