वेडा

ध्येयाच्या पाठीमागे लागताना 
स्वप्न अपयशाचे नाही पाहिले 
समोर मार्गक्रम करतांना 
कधी वळून नाही पाहिले 

आवडीच्या पाठीमागे लागून 
तिला जिंकण्याचा प्रयत्न केला 
नावडीलाही जवळ धरून 
तिला सुधारण्याचा प्रयत्न केला 

मैत्रिच्या दोन गोष्टी सांगून 
मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला 
मित्र नाही झाला तो जरी 
मी मित्र होण्याचा प्रयत्न केला 

मैत्रीवर ज्यांचा विश्वास नाही 
त्यांना मैत्रीचा हात दिला 
शिव्या श्राप पचवून त्यांचा 
पानावर त्यांच्या कात दिला 

शहाणे होऊन सांगत राहिलो तरी 
माझ्यासाठी वेडा हाच शब्द दडला 
यात लहानपणा माझा नाही 
मोठेपणा त्यांचा वाढला 
और नया पुराने