जे जवळ येत होते , आज ते दुरून गेले
त्यांनी दिलेली वचने , इथे राहून गेले
त्यांच्या प्रेमाच्या रोगात , मी पडून राहिलो
परस्परच दुसर्यांना , हाल विचारून गेले
मी मोकळी सोडली होती प्रेमाची तिजोरी
गुपचूप इथून सारे प्रेम लुटून नेले
मी तुझाच असा विश्वास देत होते
तेच आज माझा विश्वासघात करून गेले
आतापर्यंत येथे मी जगलो ज्यांच्यासाठी
त्यांनीच सारे माझे आयुष्य लुटून नेले
आपलं म्हणण्यासाठी , कोणी आज उरलं नाही
दुसऱ्यांसाठी मारणारे , केंव्हाच सरून गेले ..