कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका म्हणणाऱ्या डॉक्टरचा झाला मृत्यू । कोण होते ते डॉक्टर? आणि कशाने झाला मृत्यू?
( A doctor who said don't take the corona seriously died. Who was the doctor? And what caused death?)
मार्च महिन्यात एका डॉक्टरचा विडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते म्हणत होते के कोरोना हा चीन चा फॅड आहे त्यामुळे त्याला काहीही गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आज त्याच डॉक्टरांची मृत्यूची बातमी समोर आली आहे त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर अनिल पाटील. त्यांना उच्च मधुमेह व इतर आजार होते असे कळते. आज जुहूमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना हे चायनीच फॅड आहे, त्याला गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नाही असे सांगून ते चर्चेत आले होते. पाटील ह्यांच्या ह्या वक्तव्याचा राज्य वैद्यकीय परिषेदेकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.
मुंबईत कोरोनाचा कहर चालू असतानाच त्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर फार गाजला होता.ह्याच डॉक्टरांचा आज उच्च मधुमेह व इतर आजारामुळे आज मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चाना उधाण आले आहे.
कोरोनाची भीती बाळगणे निरर्थक आहे. भारतात आता उन्हाळा येऊ घातला आहे आणि ह्या उन्हाळ्यात कोरोना टिकणार नाही असे त्यांनी सांगितले होते.
आपल्या देशात कोरोना नव्हे तर डायरिया, मलेरिया आणि तीव्र श्वसन ह्या गंभीर समस्या आहेत. कोरोना ऐवजी गया समस्यांवर जास्त लक्स दिल पाहिजे असे त्यांनी सांगितलं होत. त्यामुळे कोरोनाला काहीही घाबरण्याचे कारण नाही असे आव्हाहन त्यांनी आपल्या मुलाखतीतून केले होते. कोरोनाबाबत हे दावे केल्यामुळे त्यांना राज्य वैदकीय परिषेदेने नोटीस बजावली होती.
अनिल पाटील ह्यांचं दादरमध्ये वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक अँड हॉस्पिटल ह्या नावाने पाटील ह्यांचं क्लिनिक होत. ते स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं सांगत असत. तर त्यांच्याकडे एम बी बी एस ची डिग्री होती. ते महाराष्ट्र राज्य वैदकीय परिषेदेचे नोंदणीकृत डॉक्टर होते असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले.
