त्या पावसात

                                                                      त्या पावसात 



कालच्या त्या पावसात 

मी पहिला पाऊस आठवला 

अन पापणीवर येण्याआधीच तो थेंब 

तसाच डोळ्यात साठवला 


उभी राहिले दारात उगच 

ओलं व्हावं सहज म्हणून 

कदाचित त्यालाही कळलं आता 

मला तुझी आठवण येते म्हणून 


गरजू लागला तो ढग असा

कि धो-धो लागला पडायला 

मी लपवलेला एक एक अश्रू 

तो बाहेर लागला काढायला 


पाणावायचे डोळे रोज 

पण लाज वाटे रडायची 

उभी रहात होते दारी आणि 

वाट पाहायचे पाऊस पडायची 


मग त्या पडणाऱ्या  पावसात 

मी खळखळून रडायचे 

गालावरच्या पावसाच्या थेंबात 

अश्रू सहज बुडायचे 


मी पुन्हा दुसऱ्या पावसापर्यंत 

बंधन हेच पाळायचे 

पाणावलेल्या डोळ्यांतले थेंब 

मी डोळ्यांमध्येच गिळायचे 




और नया पुराने