७९९ रु. हफ्त्याने गाडी घेण्याची offer वाचली असेल तर ७९९रु. मागचं सत्यही जाणून घ्या.
दिवाळी म्हटलं आपल्याकडे खरेदी करण्याची एक संधीच असते. तशात बऱ्याच कंपन्या आपापल्या प्रोडूक्टवर वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. सध्या अशीच एक ७९९ रु. मध्ये कार घेण्याची ऑफर viral होत आहे. जाणून घेऊया त्यामागील सत्य .
मी सोशल मीडिया वर एका कंपनीची एक जाहिरात पहिली ज्यात ती कंपनी तुम्हाला ७९९ रु. मध्ये गाडी खरेदी करता येईल असे सांगत आहे.
परंतु आपण ती पूर्ण जाहिरात वाचली असेल तर तुम्हाला कळेल कि हे जे ७९९ रु. आहेत ते केवळ तीन महिन्यासाठी असतील. त्यानंतर कंपनी हळूहळू तुमच्या हफ्त्यांची रक्कम वाढवेल.
ती रक्कम तीन महिन्यानंतर वाढवेल आणि किती वाढवेल हे कंपनी ठरवेल. म्हणजेच ७९९ रु. हे केवळ तुम्हाला दाखवलेलं स्वप्न आहे. त्यानंतर तुमच्याकडून जास्तीत जास्त पैसे वसूल केले जातील.
मी उत्सुकतेपोटी एका मोटार कंपनीला मोटार खरेदी करण्यासाठी म्हणून रेजिस्ट्रेशन केले . त्यानंतर त्या कंपनीचा मला फोनही आला. चाकाशी केली असता त्यांनी जो मला इ एम आई सांगितला तो त्या बँकेच्या व्याजापेक्षा जास्त वाटत होता.
त्यांना त्यासंबंधी विचारले असता असे सांगण्यात आले कि तो वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जातो. म्हणजेच जाहिरात करत असेलेल्या व्याज दरापेक्षा बँक तुमच्याकडून जास्त दराने व्याज वसूल करणार आहेत. आणि ते का विचारलं तर तुम्हाला न समजणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातील.
त्यामुळे ऑफर्स बघून जास्त हुरळून न जाता प्रत्येक्ष त्या ऑफर्स ची शहानिशा करूनच गाडी खरेदी केली पाहिजे. सांगत असलेल्या ऑफर्स आणि तुम्हाला मिळत असलेल्या ऑफर्स ह्यात फरक आढळत असेल तर सर्वकाही तपासूनच गाडी खरेदी करा.
गाडी खरेदी करताना शक्येतो एक दोन वेळा शोरूम ला भेट द्या. जास्तीत जास्त डिस्काउंट साठी आग्रह करा. बऱ्याचवेळा आपल्या आग्रहाचा फायदा होतो.