कोरोनावर कशी केली मात , महिलेची पोस्ट फेसबुकवर होतीय व्हायरल
कोरोनाला सगळं जग घाबरलेलं असतानाच फेसबुक वर कोरोनामधून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट व्हायरल होत आहे जी वाचून कोरोनाविषयीची भीती आपल्या मनातून नक्कीच कमी होईल.
अमेरिकेतील एलिझाबेथ शिन्देर या महिलेला फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची लागण झाली. (Corona survive Women share experience on facebook) डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्या त्यात पॉसिटीव्ह असल्याचे कळले. परंतु अशा भयंकर आजारावर या महिलेने मात करून पूर्णपणे बरी झाली आहे आणि त्यांनी त्यांना झालेल्या कोरोनाची पूर्ण हकीकत आपल्या पोस्ट च्या माध्यमातून जगासमोर आणली आहे.
सध्या हि पोस्ट सोसिअल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, चला बघूया काय म्हणतात एलिझाबेथ शिन्देर
एलिझाबेथ म्हणतात कि "मला COVID-19 झाला होता. ही पोस्ट लिहिण्यासाठी माझ्या मित्रांनी मला खूप प्रेरणा दिली. मी अपेक्षा करते ही पोस्ट तुम्हाला लढण्यासाठी शक्ती आणि माहिती देईल. मला या व्हायरसची लागण एका घरातील पार्टीमध्ये गेल्याने झाली होती. या पार्टीमध्ये कुणाला खोकला, शिंका आणि इतर आजाराचे लक्षण नव्हते. पण या पार्टीमधील 40 टक्के लोक आजारी पडले. माध्यमातून सतत हात धुण्यासाठी आणि या आजारापासून स्वत: चा बचाव करण्यासाठी सांगत होते. मी पण तसेच केले.”
या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लोकांपासून लांब राहावे लागेल. तसेच प्रत्येकाच्या वयानुसार तुम्हाला वेगवेगळी कोरोनाची लक्षणे दिसतात. माझे बरेच मित्र ज्यांना कोरोना झालेला आहे. ते 40 च्या पुढे, 50 च्या पुढे आणि 30 वयाच्या जवळ होते. आपल्यासाठी कोरोनाचे लक्षणे डोकेदुखी, ताप, शरीर दुखणे, सांधे दुखी आणि थकवा, असं शिंडेरने सांगितले.
“सुरुवातीला मला ताप आला तेव्हा 103 डिग्री पर्यंत पोहोचलेला. नंतर तो कमी झाला. मला सर्दी झाली, गळा खवखवत होता, नाक बंद झाले होते. 10-16 दिवस ताप आला होता. पण सुरुवातीला मी तपासणी करण्यासाठी नकार दिला. पण नंतर सिए्टल फ्लू अभ्यासाद्वारे चाचणी केली. कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यांनतर मी उपचार घेतले.”, असंही शिंडेरने पोस्टमध्ये सांगितले आहे.
शिंडेर पुढे म्हणते, “मी आता मोठे कार्यक्रम आणि गर्दीपासून लांब राहत आहे. मी जरी तुम्हाला दिसली तरी मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही. मला रुग्णालयात दाखल केले नव्हते. कोरोनाची लागण झाल्यामुळे मी डॉक्टरांच्या जवळही गेली नव्हती. कारण मी स्वत:हून बरी होत होती. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या नातेवाईकांपासून लांब राहा. या व्हायरसची मरण्याची शक्यता खूप कमी आहे"