दवाखान्यातून पळाले कोरोनाग्रस्त, पण कोणत्या शहरातून केलं पलायन आणि कोणतं शहर आहे हाय अलर्टवर ? (corona patient run away from Nagpur)
कोरोना कोरोना कोरोना (Coronavirus Disease)आणि फक्त कोरोना. सध्या सगळीकडे फक्त एकाच चर्चा आहे पाणी ती म्हणजे कोरोनाची. हा रोग किती घातक आहे किंवा घातक नाही ह्याची माहिती बरेच डॉक्टर देतांना दिसत आहेत, ह्या रोगातून बरेच रोगी बरेही झालेत आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत परंतु ज्या प्रकारे ह्या रोगाने जगात हाहाकार माजवला आहे त्यामुळे नक्कीच लोकांच्या मनात मोठ्या प्रकारची भीती बसलेली दिसून येत आहे. आणि ह्या भीतीमुळेच ज्या लोकांना ह्या रोगाची लागण झाली आहे अशी लोकं घाबरलेली दिसत आहेत.आज नागपूर येथून एक अशीच धक्कादायक घटना ऐकायला येत आहे. नागपूरच्या एका दवाखान्यामध्ये संदिग्ध असलेल्या पाच रुग्णांवर इलाज सुरु होतो परंतु ह्या रोगाच्या भीतीने म्हणा किंवा एकटं राहायच्या भीतीने म्हणा या पाचही रुग्णांनी रुग्णालयामधून पळ काढलेला आहे. त्यामुळे संपूर्ण नागपूर शहर हाय अलर्टवर आहे. ह्या रुग्णांचा सगळीकडे शोध घेतला जात आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा मारण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याची लागण फार वेगाने होत असलेली पाहायला मिळत आहे. साधा माणूस जर ह्या रुग्णाच्या जवळ थांबला तर अवघ्या पाच शेकन्दात बाजूच्या व्यक्तीला त्या रोगाची लागण होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे साहजिकच आहे कि ह्या रोगाची भीती सर्व लोकांमध्ये बसलेली आहे.
कोरोना व्हायरसमुळे सगळा जग आणि आपला देश मोठ्या संकटात असतानाच अशा घटनांमुळे एक नवीन संकट सरकारच्या समोर निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरून लोक आपल्या घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत.
ह्या रुग्णांना नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज मध्ये कोरोनाग्रस्तांसाठी तयार केलेल्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती केलं होत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे कि नाही ह्याची तपासणी करायची होती परंतु त्या आधीच हे पाचही रुग्ण १३ मार्च च्या रात्री पळून गेले आणि तेंव्हापासून ह्या रुग्णांचा शोध घेतल्या जात आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडे चौकशी त्यांनीही ह्या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे व ह्या रुग्णांसाठी पूर्ण शहरात नाकाबंदी करून त्यांचा कसून शोध घेतल्या जात आहे ह्याची माहिती दिली व त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांना शोधू असेही सांगितले आहे.
नागपूर शहरात आतापर्यंत तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे व ह्याबरोबरच महाराष्ट्रातील आकडा १७ वर गेला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतानाच दिसत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत पुणे सर्वात जास्त म्हणजेच पुण्यामध्ये १० कोरोनाग्रस्त आहेत तर त्याखालोखाल नागपूर आणि ठाणे येथे प्रत्येकी तीन तीन रुग्ण आढळून आले आहेत.
नागपूरमध्ये कोरोनामुळे बाहेर देशातून आलेल्या प्रवाशाची तपासणी केली जात आहे विशेषतः इटली, जर्मनी, फ्रांस, स्पेन,इराण आणि दक्षिण कोरिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांची वेगळ्या प्रकारे तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत जगामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वात जास्त हा चीनमध्ये आहे त्या खालोखाल इराण आणि दक्षिण कोरिया येथे आहे.
Tags:
Coronavirus Disease