corona चा वाढता धोका,पुढचे काही दिवस घरात बसा, ते कशासाठी नक्की वाचा.
मागच्या आठ दिवसापासून पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि बरेच लोक विशेषतः विदेशात ज्यांनी वाईट अनुभव घेतला हे लोक आपल्याला घरात बसण्याचा सल्ला देत आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं .
आज दिनांक २२ मार्च, जनता करफींव म्हणून जवळपास पूर्ण देश बंद असलेला पाहायला मिळत आहे. देशातील सर्व जनतेनी ह्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल देशातील जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत परंतु लोकही जी आपल्यावर परिस्थिती आली आहे त्यासाठी आपल्याला असच किमान पंधरा दिवसतरी राहावं लागेल.
मी एका पोस्ट ऑफिस मध्ये काम करतो, त्यामुळे मागच्या तीन ते चार दिवसापासून लोकांचा अतिशय बावळटपणा मी माझ्या डोळ्याने बघत आहे. पूर्वीपेक्षा पोस्टात गर्दी वाढलेली बघायला मिळत आहे.
पोस्ट ऑफिस हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्यामुळे ते अजूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना आलेल्या नाहीत परंतु लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका असे बजावले असूनसुद्धा बरेच लोक विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत.
गर्दी का वाढली
मागच्या काही दिवसापूर्वी मुंबई, पुणे आणि मोठया शहरातील शाळेनं व खाजगी कंपन्यांना सुट्ट्या जाहीर केल्या असल्यामुळे चाकरमानी लोक आपल्या गावाकडे परतायला सुरवात झाली आहे त्यामुळे एरवी ओस पडलेली खेडी भरून दिसत आहेत.
ह्या सुट्ट्या फिरायला दिलेल्या नसून आपण स्वतःला घरात कोंडून ठेवावं ह्यासाठी दिलेल्या आहेत हे माहित असूनसुद्धा सुशिक्षित लोक ह्याकडे जाणूनबुजून डोळेझाक करून पोस्ट ऑफिस आणि बँकेत गर्दी करत आहेत.
एरवी कर्मचारी एखाद्या योजनेची माहिती सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही इंटरनेटवरून माहिती घेऊ असे सांगणारे लोक केवळ टाईमपास म्हणून पोस्ट आणि बँकेत येताना दिसत आहेत.
या मोठ्या शहरातील लोकांनी अशा संकटावेळी आहे तिथे सुरक्षित राहणे गरजेचे आहे परंतु लोक घाबरून किंवा आपले राहिलेले कामं पूर्ण करण्यासाठी गावाकडे येत आहेत त्यामुळे या रोगाचा संक्रमणाचा धोका अजून दहा पटीने वाढलेला दिसत आहे.
चार पाच दिवसापूर्वी मुंबई पुण्यात सापडणारे रुग्ण आता खेड्यापर्यंत पोचलेली दिसत आहेत. त्यामुळे माय बापहो समजदार व्हा, आपल्याबरोबर इतरांचीही काळजी घ्या.
सरकारकडे सगळे मार्ग असतात तरीही सरकार सद्सदविवेकबुद्धीने आणि विचार करून निर्णय घेत आहे, परंतु आपण विशेषतः सुशिक्षित लोक अगदी बिनदिक्कतपणे इकडे तिकडे वावरत आहोत.
मला कोरोना ने काही होणार नाही किंवा आमच्याकडे असं काही नाही असे म्हणून मूर्खपणा करू नका. इटली आणि इराण मधून येणारे विडिओ आणि प्रतिक्रिया बघा. आणि विचार करा
आपल्याला सुट्टी हि घरी बसण्यासाठी दिलेली आहे हे लक्षात असू द्या आणि अति आवश्यक कामाशिवाय कृपयाकरून बाहेर पडू नका. ज्या सरकारी सेवा सुरु आहेत त्या आपल्याच सेवेसाठी सुरु आहेत परंतु अत्यावश्यक सेवेसाठी आहेत हे विसरू नका आणि विनाकारण अशा संस्थांवरचा ताण वाढवू नका.
आपण घराच्या बाहेर पडल्याने काय होईल?
आता बरेचजण म्हणतील कि मी घराच्या बाहेर थोडावेळ आल्याने काय होईल? मला का कोरोना झाला आहे का? किंवा तो कोरोना आपल्याकडे आलाच नाही तर घरात बसून काय करायचं किंवा एव्हढं का घाबरायचं.
खरंच घाबरू नकाच मुळी, आणि असे म्हणणाराना आपण शौर्य पुरस्कारही देऊ पण नंतर, हि परिस्थिती निवळल्यावर.
मित्रानो हा जो रोग आहे त्याचा जो रोगी असतो तो लगेच ओळखायला येत नाही त्यामुळे तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती बाधित आहे कि नाही हे आपल्यालाही काळात नाही त्यामुळे आपण खबरदारी घेतलेलीच बरी.
बरं हा रोग असा आहे कि ज्याला झाला तो मारतोय असं नाही, खरंतर त्याला उपचार नाही मिळाले तर तो मरणारच आहे परंतु सध्याची परिस्थिती बघत सरकार आपली किंवा अशा ग्रस्तांची काळजी घेत असल्यामुळे ते बरेही होत आहेत परंतु जर अशा रुग्णांचा आकडा वाढला तर उपचार करणारे हात कमी पडतील आणि तेंव्हा इटलीसारखी परिस्थिती येऊन डॉक्टर्सना निवड करावी लागेल कि कोणाला वाचवायचं आणि कोणाला मरू द्यायचं ते.
बरं अगोदर काय सांगत होतो कि एखाद्या रोग्यामुळे आपल्याला जर हा रोग झाला तर अगोदर तो मरेल , नंतर आपण मरू असे काही होत नाही, कदाचित ज्याच्यामुळे झाला तो ठणठणीत होईल परंतु आपण जाल , ह्यासाठी आपली आपण काळजी घ्या, आपल्या घरच्या लहान मुलांसाठी व आपल्या पन्नास वर्ष वयाच्या आई वडिलांसाठी घरात रहा .
जीवनावश्यक गोष्टी घरात ठेवा, परंतु साठाही करू नका कारण आपल्या सगळ्यांचा जगायचं आहे.
आपण घराच्या बाहेर पडताना न जाणता कुठेना कुठे हात लावत असतो, कोणाचा ना कोणाचा जवळून संपर्क येतो. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण तुम्ही गेलेल्या ठिकाणी ज जाऊन आला असेल तर तिथे राहिलेले विषाणू तुमच्याकडे येतील. तुमची हुमनीटी पॉवर जास्त असेल तर कदाचित तुमच्यावर काही परिणाम होणार नाही परंतु तुम्ही त्या विषाणूचे वाहक बनता.
आणि असेच आपण आपल्या घरी जातो, घरात लहान मुलं असू शकत, किंवा आपले वयस्कर कुटुंबीय असू शकतात. हेच विषाणू आपल्यामार्फत त्यांच्याकडे जातात आणि लहान मुले व वयस्कर यांची हुमनीटी पॉवर कमी असल्यामुळे हे विषाणू अशा व्यक्तींवर परिणाम करायला सुरुवात करतात.
त्यामुळे शकतो घराबाहेर जाणे टाळा, आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी सहकार्य करा. सुरु असलेल्या सरकारी आस्थापनांवर ताण आणू नका. त्यांनाही कुटुंब आहेत, त्यांनाही ह्या विषाणूचा धोका आहे, तेही बाधित होऊ शकतात परंतु केवळ आपल्यासाठी ते कामावर येत आहेत, आपल्या सरकारच्या आदेशच पालन करत आहेत हे लक्षात असू द्या.
देशाचे नागरिक म्हणून सध्या काय करावं ?
लोकहो आपण आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी होत नाहीत त्या सरकारकडून मागत असतो. सरकार कोणाचहि असो आपण बऱ्याच गोष्टीसाठी सरकारकडे हात पसरवत असतो. परंतु आता सरकारने फक्त आपल्याकडे सहकार्य मागितले आहे तर आपण तेव्हढही सरकारसाठी करू शकत नाही का?
बरं सहकार्यही एव्हढं सोपं मागितलं कि आपण काहीच करू नका. सीमेवर बंदूक घेऊन जाऊ नका, एखाद्या आगीत उडी मारू नका किंवा कोणतेही धोक्याचे काम करू नका फक्त पुढचे काही दिवस घरात बसा , आपण तेही करू शकत नाही का?
आपण देशाचे सुजाण नागरिक म्हणून सध्या विनाकारण प्रवास टाळायला हवा, सुट्ट्या आहेत म्हणून चला गावी जाऊ, मजा करू, परत सुट्टी मिळत नाही म्हणून राहिलेली कामे करू असे बरेच लोक म्हणत असतील.
परंतु तुमच्या लक्षात येतंय का कि ज्या गाडीने आपण प्रवास करत आहात त्यातून अगोदर एखादा कोरोनाबाधित रुग्ण गेला असेल तर, किंवा तुमच्यासोबतच एखादा रुग्ण प्रवास करत असेल तर तुम्ही कसे ओळखलं?
हे मी तर समजा म्हणतोय परंतु दिवसेंदिवस अशाही बातम्या कानावर येत आहेत कि ह्या ट्रेन मधून कोरोनाबाधित उतरवला, त्या गाडीत संदिग्ध सापडला.
मग विचार करा जर तुमच्या गाडीत असा व्यक्ती असेल तर तो किती लोकांना बाधित करणार आहे. आणि जर ह्यात तुमचंही नाव असेल तर राहिलेली कामं तर सोडाच पण तुमचं स्मशानातील कामही होणं मुश्किल आहे. तुमच्या तिरडीलाही खांदा मिळणार नाही लक्षात असुद्या.
त्याचबरोबर आपण शहरातून आपल्या गावी जात आहेत, ज्या गावावर आपण आतोनात प्रेम करतो, अशात प्रवासामध्ये तुम्हाला थोडीफार लागण झाली आणि आपण आपल्या गावी जाऊन आपल्या प्रियजनांना भेटलो तर अतिशय आनंदात असणार आमचं गाव, आमचे प्रियजन आपल्यामुळे धोक्यात येऊ शकतात.
आणि हा रोग जर खेड्यापर्यंत पोचला तर हाहाकार उडेल, कारण शहरात ज्या सोई सुविधा आहेत त्या खेड्यामध्ये मिळणार नाहीत त्यामुळे प्रयत्न करा कि आहे तिथेच सुरक्षित आणि आनंदात रहा.
ही परिस्थिती किती भयानक आहे हे तुम्हाला कळलंच असेल
आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत असा एकतारी विडिओ आला असेल जो कि इटली, चीन नाहीतरी इराण वरून आला असेल . त्यातील भयानकता लक्षात घ्या. चीन आणि इटली तर आपल्यापेक्षा प्रगत देश आहेत, तेथील जनताही श्रीमंत आणि सुजाण आहे तरीही केवळ त्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे.
चीन ने तर कडक निर्बंध लादून आपली परिस्थिती कशीबशी हाताळली आहे, ते हळूहळू पर्वपदावर येत आहेत परंतु आहे विळखा आपल्याकडे वाढायला सुरुवात होत आहे, त्यामुळे वेळोवेळी आपल्याला सांगण्यात य येत आहे कि विनाकारण घराच्या बाहेर पडू नका.
सध्या इटलीमध्ये सगळीकडे संचारबंदी आहे, कोणालाही अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर जातायेत नाही, तुम्ही जर विनाकारण बाहेर फिरताना दिसलात तर तुम्हाला पोलीस पकडून अनिश्चित काळासाठी एखाद्या अंधाऱ्या खोलीत बंद करू शकतात.
आज घडीला इटलीमध्ये रोजचे हजारो लोक बाधित होत आहेत, आणि आजच्या माहितीनुसार कालच्या चोवीस तासात ८०० लोकांचा मृत्यू झालेला आहे. तेही एवढ्या प्रगत देशात. आम्ही जर खबरदारी नाही घेतली तर आम्हाच्यावर किती भयानक परिस्थिती येऊ शकते याचा थोडा विचार करा.
इटलीमध्ये सध्या एवढे मृतदेह पडून आहेत कि त्यांना उचलायला सैनिक बोलवावे लागत आहेत, कारण ह्या रोगाने मरण पावलेल्या लोकांना इतर कोणत्याही व्यक्तीला हात लाऊदेऊ शकत नाहीत, त्यांच्या कुटुंबाच्या हवलीही करू शकत नाहीत.
एखाद्या युद्धावर निघावेत असे आर्मीच्या गाड्या रस्त्यावर दिसत आहेत त्या केवळ मृतदेह उचलण्यासाठी.
आपण काळजी कशाची करायला हवी ?
इटली हा देश आरोग्याच्या बाबतीत जगात दोन नंबरला मानला जातो तरीही त्या देशात अशी परिस्थिती आहे तर आपला देश आरोग्याच्या बाबतीत १२० च्या पुढे आहे तेंव्हा विचार करा आपल्यावर काय परिस्थिती येऊ शकते.
आज घडीला इटलीमध्ये कोरोनाबाधितांवर इलाज करण्यासाठी डॉक्टर्स कमी पडत आहेत, नर्स कमी पडत आहेत, दवाखाने कमी पडत आहेत, ऑक्सीजन कमी पडत आहे आणि त्यामुळे सरकारला वयाचा आणि महत्वाच्या व्यक्तीचा विचार करून इलाज करावा लागत आहे. सत्तरीच्या वरच्या रुग्णांना मारण्यासाठी सोडून दिल जात आहे.
इटलीची लोकसंख्या जेमतेम सहा कोटी आहे, आणि आमच्या महाराष्ट्राची बारा कोटीच्या वर. आणि देशाची १३५ कोटीच्या जास्त मग विचार करा आपल्याकडे काय काय कमी पडेल. परंतु देव ना करो आपल्यावर अशी परिस्थिती येवो, आपण सुजाण नागरिक उद्यापासून बाहेर पडणार नाहीत ह्याची खात्री आहे.
आपल्याकडे सध्याच्या माहितीनुसार खूप कमी नमुने तपासणी लॅब्स आहेत त्याचबरोबर दवाखानेही कमी आहेत. १३५ कोटी जनतेला पुरतील एव्हढे दवाखाने नाहीत, डॉक्टर्स नाहीत, नर्स नाहीत औषधे नाहीत त्यामुळे ह्या सर्वांची काळजी आपण केली पाहिजे.
आपल्यासाठी दिवसरात्र आपले पोलीस बांधव रस्त्यावर आहेत, मेडिकल स्टाफ पूर्ण रात्रंदिवस काम करत आहेत. इलाज करणाऱ्या डॉक्टर्सनाही ह्या रोगाची लागण होत आहे तरी ते मागे न हटता उपचार करत आहेत त्यामुळे आपली नाही किमान ह्या लोकांचीतरी आपण काळजी घेतली पाहिजे.
बऱ्याच सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्ट्या दिलेल्या असताना पोलीस, मेडिकल स्टाफ, बँक कर्मचारी, महावितरण कर्मचारी, पोस्ट ऑफिस कर्मचारी हे आजची आपला जीव धोक्यात घालून आपले काम करत आहेत.
ह्या सर्वांनाही कोरोनाचा धोका आहे परंतु आपल्या सेवेसाठी ते आजही काम करत आहेत आणि आपण बेजबाबदारपणे त्यांच्यावर ताण वाढवत आहोत.
सरकारने बंद पुकारला असला तरी बरेच लोक बाहेर फिरताना दिसत आहेत त्यामुळे पोलिसांना त्याकडे लक्ष घालावं लागत आहे. त्यामुळे बाहेर फिरून आपल्या पोलीस बांधवांचा ताण वाढवू नका.
आपले महत्वाच्या वेळी पैसे भेटावेत, पैशामुळे आपलं काम अडू नये यासाठी बँक कर्मचारी पोस्ट कर्मचारी आपलं कार्य पार पाडत आहेत. त्यामुळे विनाकारण चौकशी व ठेवी ठेवण्यासाठी आणि महत्वाची नसलेली काम करण्यासाठी बँकेत आणि पोस्टात गर्दी करू नका. नाहीतरी आपल्या चुकीमुळे सरकार सर्व बंद करेल व त्यानंतरची परिस्थिती फार वाईट असेल.
आपल्याला रुग्णापासून कोरोना होऊ शकतो हे माहित असूनसुद्धा डॉक्टर्स आणि नर्स आपली कामगिरी चांगली पार पाडत आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करा. आपण होम कोरंटाईन असाल, किंवा आपल्याला बाहेर फिरायची परवानगी नसेल तर आपण बाहेर फिरू नका.
आपण संशयित असाल तर कुठेही पळून जाऊ नका, आपल्या घरात किंवा सरकारने ठरवून दिलेल्या दवाखान्यात राहा. आपल्यामुळे दुसऱ्यांना बाधा होणार नाही ह्याची काळजी घ्या.
थोडक्यात
थोडक्यात काय तर सरकारला सहकार्य करा, सरकारने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा, आमच्याकडे कोरोना आला नाही, मला काही होणार नाही अशा गैरसमजूतीत राहू नका आपल्याबरोबर आपल्या देशाची काळजी घ्या.
संकटकाळात आम्ही आपल्या देशाला सहकार्य करू शकतो हे दाखवून द्या.
आपल्यासाठी सुरु असलेल्या सरकारी आस्थापनेवर विनाकारण ताण अनु नका, त्या कर्मचाऱ्यांना आपल्यामुळे काही होईल अशा घटना करू नका. त्यांनाही कुटुंब आहे हे मनात राहू द्या