देश कसा होईल कोरोनमुक्त । रस्त्यावर अजूनही गर्दी कायम.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील जनतेला बाहेर न फिरण्याचे आवाहन केलेले असतानाही रस्त्यांवर खचाखच गर्दी पाहायला मिळत आहे.
एखाद्या सणावाराला गर्दी व्हावी अशी गर्दी बाजापेठांमध्ये होत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी आवाहन करूनही लोकांना याच काहीही देणं घेणं नाही असेच दिसून येत आहे. कोरोना विषाणू पूर्ण जगभर वाऱ्याच्या वेगाने वाढत असून पूर्ण जग दहशतीच्या छायेखाली आहे तरीही आपल्या देशातील बेजबाबदार लोक ह्याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीये.
डॉक्टर्स आणि बऱ्याच जाणकारांनी सोशिअल डिस्टन्स ठेवायला हवा अशा सूचना केल्या आहेत परंतु लोक आजही गर्दी करून खरेदी करताना दिसत आहेत. ग्रुप करून गप्पा मारताना दिसत आहे त्यामुळे आपण कोरोनाला खरंच रोकु शकू का अशी शंका मनात येत आहे.
कोरोना किती महाभयंकर रोग आहे हे आपण रोजच पाश्चात्य देशातून येणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून बघत आहोत. तेथील लोक आपल्याला वारंवार सांगत आहेत कि बाबानो आम्ही जशी चूक केली तशी आपण करू नका तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत.
मी एका अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहे परंतु आम्हालाही अशा बऱ्याच बिनकामाच्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लोक नको त्या गोष्टीसाठी रंगा लावत आहेत. नको त्या चौकशांसाठी येत आहेत.
सरकार वारंवार वयोवृद्ध लोकांना बाहेर न पाडण्याचे आवाहन करीत आहे तरी बरेच लोक गांभीर्य नसल्यासारखे बाहेर फिरताना दिसत आहेत.
हे जर असेच चालू राहिले तर कोण आपल्याला वाचवणार आहे ह्यातून?
आमच्या अजून बातम्या खालील लिंकवर वाचा:-
२. दवाखान्यातून पळाले कोरोनाग्रस्त, पण कोणत्या शहरातून केलं पलायन आणि कोणतं शहर आहे हाय अलर्टवर ? (corona patient run away from Nagpur)
आता आपणच आपली काळजी घ्या.
मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून मा. मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा पुन्हा आवाहन करत आहेत कि महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका तरीही काही लोक ऐकताना दिसत नाहीयेत. त्यामुळे आता वेळ अली आहे आपणच आपली काळजी घ्यायची.
आता लोकांना समजवायचं राहू द्या व स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा.