राहूलने पूर्ण बळ एकवटून गीताला आज भेटायला बोलावलं आहे, पण मनातून पुर्ता घाबरून गेला आहे, कशाला नको त्या भानगडीत पडलो आणि अशी अवदसा आठवली असा मनात विचार येऊ लागला आहे.
खरं तर राहूल असं काही करेन असं कोणालाच पटणार नाही, राहूल साधा मुलगा, खेड्यातून आपल्या मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून शहरात सरकारी नोकरी करणारा तरुण, कधी कोणाच्या आध्यात ना मध्यात, नोकरी लागून ३-४ वर्ष होत आलीत पण कुठलीही तक्रार नाही गड्याची.
राहूलची पोस्टींग ज्या गावात झाली त्या गावच्या एका काॅलनीत ३-४ वर्षापासून रहात आहे पण कोणाच्याही नजरेत भरेल असं कुठलही वर्तन त्याने केल नाही, अगदी काॅलनीत रहातो कि नाही अश्या प्रकारे त्याची वागनूक, पण याच काॅलनितली गीता त्याला मागच्या २ वर्षापासून आवडत आहे, तो तिला २ वर्षापासून बघत आला आहे पण अजून तिला काहीच बोलला नाही, कदाचित हे गितालाही माहीत असावं असं एकूण तिच्या वागण्यावरुन राहूलला वाटलं परंतु भाव खाणं हे मुलींचा जन्मजात स्वभाव असावा असा राहूलला वाटलं.
राहूल तसा साधारण दिसणारा मुलगा, राहूलच्या मानानं गिता सुंदर, देखणी मुलगी, पाणीदार डोळे, निमुळता चेहरा, कपाळावर कोरलेलं गोंदण आणि सतत हसतमुख चेहरा त्यामुळे ती अजून उठून दिसायची. राहूल आणि गिताचं एकदाच बोलणं झालं होतं तेंव्हा तिचं बोलणंही राहूलला मोहिनी घालून गेलं होतं, राहूलकडे ती स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची ह्याचं मार्गदर्शन घ्यायला आली होती.
राहूलने आज तिला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोलाऊन घेतलं खरं पण आता तोच घबरला आहे, ज्या गार्डनमध्ये त्याने तिला बोलावलं तिथे झाडाखाली येरझरा मारत आहे आणि पूर्ण घामात डबडबला आहे, गिता आल्यावर काय बोलणार, का डायरेक्ट भडकणार? आपण बोलायला सुरूवात कोठून करावी? गीताला आपण असं एकटीला बोलावणं आवडेल कि नाही? अशा नानाविध विचाराणे राहूलला पार वेडं केलं.
तेवढ्यात गिता गेटमधून आत येतांना दिसली तशी राहूलच्या पायाखालची वाळू सरकली, काळजाचे ठोके वाढायला लागले, हात आपोआप खिशातल्या रुमालाकडे गेला. तशी गीता धपाधपा येतांना दिसली, तिच्या एकून चालण्यावरून गीताला असं बोलावणं आवडलेलं नसावं असच दिसत होतं, चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला होता तशी राहूलच्या जवळ येऊन तिने स्कार्फ सोडता सोडताच प्रश्न केला.
"बोल मला का बोलावलं आहे ईथे?"
हा असला रागा रागात प्रश्न ऐकून राहूलची बोबडीच वळली, राहूल रूमालाने घाम पुसत गप्पच राहिला.
"अरे बोलना मला ईथे का बोलावलं आहे?"
गीताचा परत तोच प्रश्न पण यावेळी तिचा आवाज जरा सौम्य झाला त्यामुळे राहूलला थोडं बळ मिळालं आणि घाबरत घाबरतच बोलला,
"मला तू आवडतेस"
"हा म्, मला ते माहीत आहे, दुसरं काय ते बोल"
मला माहीत आहे हे ऐकून राहूल पार गोंधळून गेला, त्याने आश्चर्याने बोलला,
"आॅ, म्हणजे तूपण......"
वाक्य पूर्ण करण्याच्या अगोदरच गिताने त्याला थांबवलं.
"नाही, मला तू नाही आवडत, फक्त मला माहीत आहे कि मी तुला आवडते, म्हणून तर सतत पाठलाग करतोस, सतत बघत असतोस. मलाही तुला हेच सांगायचं होतं कि तू असा पहातजाऊ नकोस, लोकांना गैरसमज होतो. तू चांगला मुलगा आहेस असं सगळे काॅलनितले लोकं म्हणतात, तसाच रहा आणि मीही तुला वाईट नाही समजत, पण प्लीज असं बघतजाऊ नको, मला बाहेर पडायला भिती वाटते त्यामुळे".
एवढं सगळं बोलून गीता स्कार्फ बांधून निघून गेली, राहूल पुढे काहीच बोलला नाही, गीताला बाहेर जातांना पाठमोरा पहात राहिला.
राहूलला फार वाईट वाटलं, त्याला गीता नकार देईन असं वाटलंच नव्हतं, तो गार्डनमधून बाहेर पडला आणि आपल्या बाईकला सेल्फ मारून झटक्यानं निघून गेला.
आपल्या रूमवर गेला, आज त्याला फार एकटं एकटं वाटत होतं, आतापर्यंतही तो एकटाच होता पण रोज गीताला बघायचा तेंव्हा कोणीतरी आपल्या सोबात आहे ह्याची त्याला जाणीव व्हायची. वैतागून एकटाच बडबडत पडला,
"मायला ही गीतापण समजते काय स्वतःला? , मी वाईट नाही वाटत हिला तर होकार का नाही दिला?, आणि मी काय हिला ञास देतो कि माझ्यामुळे बाहेर निघावं वाटत नाही. जाऊदे, मरूदे.
सकाळी राहूल ऊठला, सगळं आटोपून तयार झाला पण कामावर जायची ईच्छा नव्हती म्हणून आज रजा टाकली, चेहऱ्यावर जास्त दु:ख दिसत नव्हतं, खरंतर त्याने राञीच ठरवलं होतं कि ज्यांना आपली किंमत नाही त्यांच दुःख का मानायचं? म्हणून तो शांत होता. सकाळी सकाळीच संतोषला फोन करून आपल्या ठरलेल्या चहाच्या कट्टयावर बोलावलं.
संत्या आपल्या बाईकवरून ठरलेल्या ठिकाणी आला, स्टँड लागतो न लागतो लगेच राहूलला बोलला,
"काय रे राव्हल्या, भेटली का तुझी शितली, आ?"
राहूल आपल्या पडलेल्या आवाजातच बोलला,
"नाही....म्हणजे ....
राहूल वाक्या पूर्ण करतो न करतो लगेच संत्याचा मोबाईल वाजला, त्याच्या मैञिणीचा काॅल होता कदाचित
"हॅलो, हा राधा बोल की,.......मी ईथे मिञासोबत चहा घेत आहे.........नाही मी फ्रिच आहे......बरं थांब आलोच."
"अरे राव्हल्या तुझ्या वहिनीचा फोन होता, आलोच दहा मिनटात"
असं म्हणून संत्यापण काही न ऐकताच तिथून बाहेर पडला, खरं म्हणजे राहूलला संत्याला सगळं काही सांगायचं होतं, मन हलकं करायचं होतं, संत्यानं विचारत जावं आणि मी २ वर्षापासूनचं सांगत जावं असं आज राहूलला वाटत होत पण तेही करता नाही आलं, संत्या राहूलच्या भावना न समजताच निघून गेला ह्याचं राहूलला फार वाईट वाटलं, ईथे कोणाची कोणाला पर्वाच नाही असं राहूलला वाटून गेलं. सगळे आपापल्या कामात बिझी आहेत, कोणीच कोणाला विचारत नाही ह्या विचाराणे राहूल निराश झाला.
राञी राहूल घरी जातांना राहूलने खेळण्यांच्या दुकानातून काहीतरी घेतलं, कुणाला दिसणार नाही अशा प्रकारे लपून आपल्या बॅगेत टाकलं आणि घरी आला.
बॅगेतून एक बाहूली हळूच बाहेर काढली, मघाशी खेळण्याच्या दुकानातून कदाचित हिच बाहुली घेतली असावी त्याने. बाहुली बॅगेतून काढून टेबलवर ठेवली व तो तिच्याशी एखाद्या वेड्यासारख्या गप्पा मारू लागला.
"हाय.....आजपासून तू माझी गीता, चालेलना?"
आणि स्वतःच त्या बाहूलीची होकारार्थी मान हालंवली.
"अरे व्वा!, हो म्हणतीय, अगं कायना गिता मला ती आपल्या काॅलनीतली गिता आवडते, पण साली नाही बोल्ली, आणि माझी भिती वाटते म्हणे मी तिच्याकडे बघतो तर, म्हटलं होतं असं एकटं एकटं राहण्यापेक्षा कोणी सोबत ठेवावं, पण ह्यांना आपली किंमतच नाही, जाऊदे, आजपासून तुच माझी गिता, बरं चल तू थकली असशीलना?, झोप, गुड नाईट."
किती दिवसाचं राहूलला आज मन हलकं झाल्यासारखं वाटलं, खरं म्हणजे आजूनही त्याच्या मनात गिता भेटली नाही याची खंत आहे, आजही गिताने त्याला बोलावं अशी मनोमन ईच्छा आहे पण नाईलाज असल्यामुळे त्याने आपल्या करमणुकिचं साधन शोधलं होतं.
आता तो पाहिल्यासारखा रस्त्यावर थांबत नव्हता, गिता रस्त्याने दिसली तरी तो तिच्याकडे पहिल्यासारखा बघत नव्हता, तो जाणून बुजून दुर्लक्ष करत होता. ह्याचे दोन कारणं होती, एक म्हणजे ती माझ्याकडे असं पहातजाऊ नको बोलली आणि दुसरं म्हणजे त्याला तिची भीतीही वाटत होती.
आज असाच ड्युटी वरुन घरी येतांना गीता तिच्या दोन मैञीनींसोबत दिसली, राहूल नेहमीप्रमाणे आपल्या बाईकवरून येत होता, नजरा नजर झाली पण राहूलने न ओळखल्यासारखं केलं आणि निघून आला, हे बघून गीताला थोडं विचिञंच वाटलं, ती चालता चालता त्याच्या पाठमोऱ्या बाईककडे बघत राहिली, मैञीनी पुढे तशाच चालत राहिल्या, गिता मनातल्या मनात बोलली,
"आतापर्यंत मी नकार दिल्यावर मुलं नाराज, उदास होतांना पाहिली, हे काय नवीनच?, हा तर मस्त खुश दिसतोय नकार दिला तरीही, ह्याने मी बघू नको म्हटलं म्हणून जास्त मनावर घेतलं कि काय??, असं करू नको रे राजा, मलाही आवडतं तू बघतोस तर."
मनातल्या मनात पुटपुटली आणि निघून गेली.
राहूल घरी आला, दरवाजा ऊघडला, तो आज जास्तच खुश दिसत होता, आल्या आल्या आपल्या बाहुली गीताला आवाज दिला,
" गिता, कुठेस तू, चल बाहेर ये लवकर.... आजना ती गिता दिसली आणि थोड्या वेगळ्याच मूडमध्ये वाटली, मला बघत उभी होती बराच वेळ, मी बाईकच्या आरशात पाहिला, आई शपत!"....बरं ते सोड तुला एक सांगायचं विसरलो, आपली बदली झालीय, उद्याच निघायचय आपल्याला, चल मी आवरतो, तू आराम कर."
राहूल सकाळी उठला, सगळी आवरा आवर राञीच त्याने करून ठेवली होती, त्याच्याकडे जास्त सामानही नव्हतं त्यामुळे जास्त वेळ लागला नव्हता.
सकाळी आपल्या दोन बॅग्स घेऊन स्टँड वर आला, बस ची वाट बघत होता, तेव्हढ्यात मागून राहूल असा आवाज आला, आवाज ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून बघतो तर गीता होती.
"अरे एवढ्या सकाळीच ह्या बॅग्स घेऊन कुठे निघालास?"
राहूल आपल्याच आवाजात बोलला.
"बदली झाली माझी"
हे ऐकून गीताला धक्का बसला आणि एकदम ओरडली.
"काय!"
"अगं, एवढं ओरडायला काय झालय तुला?"
गीताचा आवाज नरम झाला होता, डोळ्यांत पाणी दिसत होतं.
"आय मिन अचानक?"
"हो"
आणि राहूल आपल्या बस ची वाट बघत उभा राहिला.
"जाऊ नकोना" गीताचा मागून आवाज आला
हे ऐकून राहूलला थोडा रागच आला, हिनेच मला नकार दिला आणि हिला काय करायचं मी जाऊ आथवा राहो असं राहूलला वाटलं.
"का? आणि माझं काय आडलय ईथं रहायला?"
राहूलचा राग पाहून गीताला आनखीनच रडायला झालं पण ती सारखं स्वतःला सावरत होती.
"अरे थांबना, तुला तुकडे नवीन ठिकाणी करमनार नाही".
ती नरम होत चालली तसा राहूल गरम होत चालला होता, तो राहा रागातच बोलत होता.
"मला कुठेही करमतं समजलीस?"
एवढं बोलला आणि एका समोरून येणाऱ्या कारला हात दिला तशी ती थांबली, राहूलने आपल्या बॅग्स आत घेऊन बसला व गीताला बाय केलं, राहूल बसला तसा हिताच्या अश्रूंचा बांधच फुटला, कार चालू लागते न लागते लगेच गीता जोरात 'राहूल' अस ओरडली, तशी कार थांबली. राहूल मागे वळून बघतोय तर काय, गिता रडतीय आणि आपल्याकडे पळत येतांना दिसली, राहूलला आश्चर्य झालं तो गाडीच्या बाहेर आला कि लगेच गीता येऊन बिलगली, आणि ढसाढसा रडायला लागली.
"जाऊ नकोना प्लीज राहूल, तुला करमेल रे तिकडे पण मलाच नाही करमनार, तू माझ्याकडे बघतोस तर माझा दिवस छान जातो, मलाही आवडतं तु माझ्याकडे बघतोस तर, साॅरी मीच भाव खायला नको होता, माझंच चुकलं, पण मी समाजाला घाबरले रे, समजून घे मला आणि असच काही काही बडबडत राहिली.