मही माय.
चार पोर हायीत तिला
तरी जपत नाही जीवाला
कुठल्या पिक्चरची कहाणी नाय.........
व्हय ती मही माय हाय...........
जिंदगी गेली सगळी
पण
काम करतीच हाय अजून
म्हणती काम करावच लागत
भागतय का कुठ लाजून ?
लय सांगतो मीपण
आता बस झाल माय...........
.
व्हय ती मही माय हाय ..........
मंबईला तिनं टिकल्या वायल्या
केली पडावाची काम
काटा बुडला, गुडघा फुटला
कोणी म्हणल नाही थांब
लेकरा बाळाच आवरून सगळ
रोज ती कामाला जय..........
व्हय ती मही माय हाय.........
दगड फोडली गड्यावानी
मुरूम तिनं वायला
आमच्यासाठी ह्या मायीन
दिस कसा कसा पहिला
माय तुह्या संघर्षाची
गोष्टच
सरत नाय..........
व्हय ती मही माय हाय ..........
खडी, रेती वायली तीन
सिमेंट बी कालवली
हातापायाची लाकड करून
चूल आमची चालवली
एवढी पोर असूनसुद्धा
दुल्डी रिकामी ठुली नाय......
व्हय ती मही माय हाय......
निंदलस, खुरपलस
कष्ट केले फार
माय तू कोनापुड
मानली नाहीस हार
काय सांगू पोरांसाठी
माय केलस तू काय ......
व्हय ती मही माय हाय ..........
मुग काढला, उडीद काढला
स्वायाबिन, तूर बडवली
काबाडकष्ट करून माय
तू मही जिंदगी घडवली
मह्या एक एका श्वासावर
माय तुवाच हक्क हाय..........
व्हय ती मही माय हाय..........
कापूस, बोंड यचली
धसकटहि उपटली
माय तुह्या असण्याची
किंमत मला ग पटली
गाई म्हशी पाळून तू
आम्हाला चारलीस साय.......
व्हय ती मही माय........
बाप करायचा काम
पण प्यायचा फार दारू
बारीक सारीक गोष्टीला
लागायचा मायला मारू
सहन केल्या लाता, बुक्या
पण नाय काढला घरातून पाय............
व्हय ती मही माय हाय........
झोपडीही नव्हती तिला
पायपात घर करून रायली
उपास तापास केले
कोणती देवी नाय पावली
मह्य ह्या आयुष्यात
माय तूच देवी हाय.....
व्हय तू मही माय हाय......
मंबई, भोपाळ, कोचीन
तू कुठ कुठ गेली
तू तुह्या पिल्लांना
कवा ठुली नाय भुकेली
ताथी भाकर चारून आम्हा
स्वतः शिळे कुटके खाय.......
व्हय ती मही माय हाय..........
Tags:
Stories/Poems