मी मलाच सावरते.

मी मलाच सावरते. 



    'आज का कोणास ठाऊक जीव लागत नाही, शेतात. जायचय पण कामंच आटोपत नाहीत लवकर लवकर, घरच्या सगळ्यांचं मलाच करावं लागतं, नवरा आपला जाऊन बसलाय शहरात, ना माझ्या कामाची कदर, ना चिंता.' माधवी स्वतःशीच बडबडत आपले कामं आटोपत होती.      

माधवी कशीबशी कामं आटोपून शेतात आली, शेतात काही कामं नव्हती, फक्त गुरं ढोरं शेतात येऊ नये म्हणून शेत सांभाळायला यावं लागायचं. लग्नाला २-३ वर्ष झाली होती, खरंतर तिचं लग्न तिच्या घरच्यानी तिच्या मर्जीच्या विरूद्ध केलं होतं, त्यामुळे ती लग्नानंतर एक वर्षभर नाराज होती, पण आता तिनं स्वतःला सावरत, स्वतःला समजावून खुश रहायचा प्रयत्न करत होती. बायकांमध्ये ही एक फार मोठी गोष्ट असते, कि सर्व स्वप्न आणि अपेक्षा बाजूला सारून आहे त्या परिस्थितीत फक्त बायकाच जगू शकतात, आणि त्याचं मोठ उदाहरण म्हणजे ही माधवी होती.          

काॅलेजला असतांना कितीतरी अपेक्षा आणि ईच्छा तिने आपल्या प्रियकराला सांगितल्या होत्या, आणि त्याने आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या सर्व ईच्छा मी पूर्ण करीन अशी ग्वाही ही दिली होती. पण जगातल्या किती प्रेमकहाण्या सत्यात उतरल्यात कि यांचीपण खरी ठरेल, शेवटी ह्या दोघांच्याही प्रेमाला कोणाची नजर लागली आणि माधवीला ईच्छा नसताना लग्न करावं लागलं.        

गुरांना चारा टाकून, पाणी पाजून माधवी झाडाखाली येऊन बसली, सकाळपासूनच तिचं कुठे मन लागत नव्हतं, आज तिला सारखी प्रसादची आठवण येत होती. ती निवांत झाडाखाली बसली, पण डोक्यात सारख्या जुण्या आठवणी नाचत होत्या, त्या आठवून तिच्या चेहऱ्यावर हसूही येत होतं आणि दुःखही वाटत होतं. न रहावून ती शेवटी सगळं आठवायला लागली.                

प्रसाद बस स्टॅण्ड वर बस ची वाट बघत होता, कदाचित का‌ॅलेजला जात असावा, पुण्याला ईंजिनिअरींग करत होता, माधवी आपल्या वडीलांसोबत मामाकडे जात होती, तेंव्हा प्रसाद आणि तिची अोळख झाली. तिचे वडील तसे प्रसादला अगोदरपासून ओळखत होते, तो तिच्या वडिलांच्या लांबच्या नात्यात होता. त्या दोघांनी एकमेकांना नमस्कार घालून माधवीच्या वडिलांनी तिची ओळख करून दिली होती. "हाय!, मी प्रसाद" प्रसाद पुढे हात करून बोलला.    

माधवीला जास्त बोलायची सवय नव्हती, त्यामुळे ती काहीच बोलली नाही, फक्त थोडी स्माईल केली आणि खाली पहात राहिली. प्रसादला माञ कानात मारल्यासारखं वाटलं.         

थोड्या वेळाने बस आली आणि प्रसाद निघून गेला, लगोलग माधवी आणि तिचे वडीलही एका बसमध्ये बसले आणि गेले.         नंतर ब-याच दिवसानंतर माधवीच्या बी. ए च्या अॅडमिशनसाठी त्यांना पुण्याला जावं लागलं तेंव्हा प्रसादने त्यांना फार मदत केली, त्यांच्या रहाण्याच्या सोईपासून काॅलेजच्या अॅडमिशनपर्यंत. प्रसादच्या ह्या दिलदार वृत्तीमुळे माधवीला तो आवडायला लागला होता.          

माधवीचं काॅलेज सुरू झालं, रहायला ती मुलींच्या हाॅस्टेलला होती, तिचं तसं आपलं कोणी नव्हतं पुण्यात, प्रसाद हा एकच आधार होता, पुढे पुढे तर त्याच्याशिवाय माधवीचं एकही काम होत नव्हतं,  त्याची एवढी सवय कशी लागली हेही तिला कळलं नाही.         

 एकेदिवशी माधवीला करमत नव्हतं, रविवारचा दिवस होता, माधवीने प्रसादला फोन करून बोलावून घेतलं आणि दोघेही सिंहगड ला फिरायला गेले. प्रसादच्या बाईकवरून मस्त एखाद्या कपलसारखे हळूहळू, एकमेकांना बोलत बोलत निघाले. माधवीचा खरंतर त्याच्यावर जीव जडला होता पण तिला त्याला सांगणं शक्य होत नव्हतं.          

चालता चालता एका ठिकाणी माधवीला भेळ दिसली, माधवीने बाईक थांबवायला सांगितली आणि भेळ घेऊन खात बसले दोघेही. भेळ खाता खाता माधवीनेच विषय काढला,   "काय रे, तुला काॅलेजला मिञ मैञीणी वगेरे असतीलना?" "हो आहेतना" प्रसाद बोलला.   "मग तुम्ही कुठे फिरायला जाता कि नाही?"   "जातात बाकीचे, मी नाही जात जास्त" प्रसाद उत्तरला. लगेच माधवीने आश्चर्यानं विचारलं.   "का?."   "का म्हणजे, मला नाही आवडत" माधवीला त्याची सखोल चौकशी करायची होती, पण तो जास्त बोलत नव्हता, तो मनात काहीतरी लपवतोय असं वाटत होतं, माधवीला वाटायला लागलं कि एवढी सुंदर मुलगी सोबत आहे तरी हा असा आखडून का वागत असेल?, ह्याला असं माझ्यासोबत यायला आवडलं नसेल का?         

भेळ खाऊन झाल्यावर परत बाईकवर बसून पुढे गेले, सिंहगड डोंगराचा चढ लागला होता, मस्त हिरवळ पसरली होती, रस्त्याने जास्त कोणी दिसत नव्हतं, एखादी गाडी यायची आणि निघून जायची, प्रसादमाञ बैलगाडीसारख्या स्पिडने आपली बाईक चालवत होता, पुढे एका वळणावर त्याने बाईक थांबवली आणि एका दगडावर जाऊन बसला. 

तो अचानक असं का करतोय हे माधवीलाही कळेना, ती त्याच्या जवळ गेली आणि विचारायला लागली. 
 "काय झालं?, का थांबलास?" 

 प्रसादने माधवीकडे पाहिलं आणि खाली बघत राहिला. 
परत माधवीने विचारल, 

 "अरे काय झालं तुला?, मी बोलवायला नको होतं का? 

 "तसं नाही काही, मला सुचत नाही काहीच, काय करू ते." 

प्रसाद तिच्याकडे न बघताच बोलला. 

 " आ!, अरे काय सुचत नाही तुला, जरा निट सांगशील का?" 

माधवी आता वैतागली होती. शेवटी प्रसादने मनातल्या मनात ठरवलं कि हिला सांगूनच टाकूया, काय होईल ते होऊदे. 

 "मला तू हवी आहे!"   

"व्हाट???" माधवीला आश्चर्य झालं, आणि रागही आला. 

राग ह्या गोष्टींचा आला नाही कि त्याने प्रपोज केलं, राग तर ह्या गोष्टीचा आला कि एवढंस सांगायला हा एवढे नाटकं का करतोय. तिलाही तो आवडायचा त्यामुळे त्याचा राग येण्याचा प्रश्नच नव्हता, उलट जे माधवी करणार होती तेच त्याने केलं, तिला स्वतःवर विश्वास होईना. पण जास्त आनंद न दाखवताच ती त्याच्याशी बोलली. 

 "काय,परत बोल" 

 "आय लव यु, तू माझी व्हावी असं मला वाटतय, प्लीज रागवू नको, तुला राग येईल म्हणूनच मी तुला बोलत नव्हतो. 

 माधवीला मनातून खुप आनंद झाला होता, पण दाखवत नव्हती.   

'मला राग नाही आला, चल आपण निघूया" असं माधवी त्याला बोलली आणि बाईकवर बसले, पण माधवीने त्याला हो ही म्हटलं नाही आणि नाही ही म्हटलं नाही त्यामुळे बिचारा प्रसाद कावराबावरा होऊन कसातरी बाईकवर बसून गडाच्या दिशेने निघाला.        

गडावर पोचल्यावर छान वातावरण होतं, माधवी आनंदाने त्याच्यासोबत फिरत होती, माञ ह्याला अजून उत्तर मिळालेलं नसल्यामुळे तो बेचैन होता, फिरता फिरता परत त्याने तिला विचारलं.   

"तू उत्तर दिलं नाहीस"   

"उत्तर द्यायलाच हवं का?" 

असं लडिवाळ बोलून माधवीने त्याचा हात हातात घेतला, ती ईशा-याने होकार देतेय हे प्रसादच्या डोक्यात लवकर आलं नाही, थोड्यावेळाने चेहऱ्यावर हसू उमटले, आणि दोघेही हसायला लागले.       

आता दोघेही आनंदात होते, दोघानाही वाटलं नव्हतं कि एकाच भेटीत असे जीवनसाथी मिळतील. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून मस्त फिरत होते, गरम गरम मकेचं कणीस खात होते, आपल्या कहाणीला ४-५ वर्ष झाले असावेत असे ते वागत होते. मनसोक्त फिरुन ते परत गेले, परत जातांना प्रसादने माधवीला आपल्या होस्टेलवर सोडलं, लवकरच परत भेटू एखाद्या दिवशी म्हणून माधवीने निरोप दिला आणि प्रसाद आपल्या रूमवर निघून गेला.      

हल्ली रोज एकमेकांचे फोनवर बोलणं होऊ लागले, अचानक त्या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली, दोघानाही एकमेकांना बोलल्याशिवाय झोप लागत नव्हती. एकमेकांना परत परत भेटावं, समोरासमोर बसून गप्पा माराव्या असं माधवीला वाटू लागलं. म्हणून माधवीने या रविवारी भेटूया म्हणून प्रसादला विचारलं, तेंव्हा तोही तयार झाला, प्रसादचा मिञही गावी गेला होता, त्यामुळे तो एकटाच रूमवर असल्यामुळे त्याने तिला रूमवरच बोलाऊन घेतलं.        

माधवी आज छान सजून धजून प्रसादला भेटायला आली होती, येतांना दोन समोसे घेऊन आली. रुमबाहेर येऊन दाराची कडी वाजवली, प्रसादने दार उघडलं आणि तिच्याकडे बघतच राहिला.   

"वाव!, काय सुंदर दिसत आहेस , ये ये आत ये लवकर" 

 "थँक्यू!, आवडले??", माधवीने प्रसादला विचारलं.   

"अगं आवडली म्हणजे काय, एवढी आवडलीस कि मिठी मारावी आणि सोडूच नाही दिवसभर असं वाटतय" 

प्रसादने नितळ मनाने सांगून टाकलं.        

माधवी थोडी लाजली आणि बोलली. "मग अडवलय कोणी!, मलापण काही घाई नाही जाण्याची"    

प्रसाद हसला आणि तिला बसायला सांगितले,  माधवीने आणलेले समोसे दोघांनी खाल्ले आणि गप्पा मारीत बसले, काॅलेजच्या, गावाकडच्या गोष्टी निघाल्या, बोलत बोलत पार भविष्याचापण विचार करायला लागले.         माधवी प्रसादच्या जवळ त्याला चिटकूण त्याच्या बेडवर बसली, लाडात येऊन त्याच्या अंगावर पाय टाकत होती, त्याच्या केसामधून हात फिरवत होती, मध्ये मध्ये त्याच्या हातात घेतलेल्या हाताला किस करत होती, त्यामुळे प्रसादचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत होता, तरीही तो स्वतःला सावरण्याचा बराच प्रयत्न करत होता.  

                  शेवटी त्याला रहावलं नाही, त्याने माधवीला किस केलं, पण लगेच भानावर येत ते दोघ बाजूला झाले, माधवी लाजली, थोडावेळ काय बोलावं हे दोघानाही सुचेना, प्रसादला वाटलं तिला राग आला असावा म्हणून तो तिची माफी मागणार तेवढ्यात तिने त्याला बेडवर ढकललं आणि तिही बेडवर पडली, आता प्रसाद कावराबावरा झाला, पुढे काय होणार आता त्याला दिसू लागलं.        

माधवी त्याच्या सर्व शरीराचे चुंबन घेत होती, त्यामुळे त्यालाही रहावत नव्हतं, ते दोघेही एकमेकांत बुडून गेले, प्रसादनेही आता तिला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली, माधवी बेभान झाली, तिला आजूबाजुला आता काहीच दिसत नव्हतं, फक्त प्रसाद आणि तिच. त्यांच्या ह्या प्रेमलिलयेत कधी नको ते होऊन गेलं ते त्या दोघानाही कळलं नाही, दोघांचेही मनं शांत झाल्यावर अर्धा तास ते तसेच बेडवर पडून होते, एकमेकांना बघून स्माईल करत होते.      

 संध्याकाळ होत आली होती, त्यामुळे माधवीने आवरलं आणि ती निघून गेली, तसा प्रसादही फ्रेश होऊन बाहेर फिरायला गेला, तसा तो रोजच संध्याकाळी रोडने पाय मोकळे करायला जायचा, आज चेहऱ्यावर तेज दिसत होतं, झालेल्या प्रकाराने आनंदात होता, ती धुंदी अजूनही उतरली नव्हती, तोच विचार करत आपला फिरत होता, तेवढयात समोरून कधी ट्रक आला त्यालाही कळलं नाही, त्याला त्या ट्रकचा मोठा फटका लागला आणि तो रोडच्या बाजूला जाऊन पडला, आजूबाजूच्या लोकांनी त्याला उचललं, त्याचं खुप रक्त जात होतं, त्याला लोकानी दवाखान्यात नेलं, पण डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.       

माधवीने मी पोचले सांगण्यासाठी म्हणून फोन केला तेंव्हा तिला हा प्रकार समजला, हे ऐकून माधवीचे हातपाय गळून गेले, ती जागीच बसली, ती ढसाढसा रडायला लागली, ओरडायला लागली,  तीचं असं अचानक वागणं बघून तिच्या मैञीणीही घाबरून गेल्या, नंतर सगळा प्रकार समजल्यावर तिला घेऊन तिच्या मैञीणी दवाखान्यात गेल्या, माधवी तर रडून रडून वेडी झाली होती, तिच्या मैञीणीनी फोन करून तिच्या घरी सांगून प्रसादच्या घरी सांगायला सांगितलं.       

लगेच माधवीचे वडील, प्रसादच्या घरचे आले, झालेल्या प्रकाराने माधवीला काहीच भान राहिलं नव्हतं, ती जेवतही नव्हती, हे बघून तिच्या वडिलांनी तिला घरी नेलं, पण घरीही ती शूद्धीवर आली नाही, सारखं प्रसादच्या आठवणीत रडत रहायची.        

आता एक वर्ष होत आलं होतं, माधवी थोडं नाॅरमल वागायला लागली होती, ती प्रसादला विसरली नव्हती पण स्वतःला सावरत होती. तिच्या घरच्यांना तिची फार काळजी वाटत होती, त्यामुळे त्यांनी माधवीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला, माधवीने फार विरोध केला, मला लग्न करायचे नाही असं बजावून सांगितलं पण घरच्यांनी तिला शपथा घालून बळजबरीनं लग्न लावून दिलं.         

नंतर तिनेही आपल्या आई वडिलांचं नाव बदनाम होऊ नये म्हणून काळजावर दगड ठेवून सगळं सहण केलं आणि संसार करत राहिली.         तेवढ्यात कोणाचातरी आवाज ऐकू आला. "बैल सुटला ओ माधवी बहिणी, बैल मका खातोय बैल" माधवी दचकली, आणि ताडकन उठून बैलाकडे पळत सुटली. 


 लेखक.- सागर दुभळकर            9604084846
और नया पुराने