मरता नाही आले
त्या दुःखाचे भांडवल मला करता आले नाही
हाय, मला कुढत कुढत मरता आले नाही
तु तर गेलीस निर्धास्त, आली त्याच वेगाने
हाय, मला रडत रडत आडवता आले नाही
तुला न पटल्या माझ्या गोष्टी अन् भावना
होय, मला तुला त्या सांगता आल्या नाही
कशास गेलो उगच नकळत नको त्या गावा
हाय, मला रस्ताच पुसता आला नाही
कळून चुकले सारेच प्रश्न, सा-याच क्लुप्त्या
हाय, माझ्याकडे आता वेळच उरला नाही
Tags:
Stories/Poems