प्रेमफुला

प्रेमफुला 

हे प्रेमफुला सुगंध तुझा दरवळुदे चारी दिशा 
ना रात असो, ना दिन तुझा मदधुंद हि अली नशा 

हा गारवा, मन पारवा, फिरतो बघ भर भर हा 
तुझ्या सोबती, रमते किती, बाहेर जरा पडूनी पहा 
ये अंतरी, मन मंदिरी जाणून घे माझी दशा 
ना रात असो, ना दिन तुझा मदधुंद हि अली नशा

रंग सावळा, मला भावला, बंदिस्त तू केले मला 
जाऊ कसा, फिरुनी असा, समजून घे माझ्या फुला 
ना बोलवे, मन हळवे, नयन बोलती नयनी भाषा 
ना रात असो, ना दिन तुझा मदधुंद हि अली नशा

एक तू तेथे, एक मी येथे, जीव गुंतला तुझ्यात कसा 
हातामध्ये हा हात घे, तुझ्या दिल्लावरी, माझा ठसा 
मन चातक, झाला आशिक येशील तू वेडी आशा 
ना रात असो, ना दिन तुझा मदधुंद हि अली नशा
हे प्रेमफुला सुगंध तुझा दरवळुदे चारी दिशा 

सागर दुभळकर 
और नया पुराने