येशील का गं ?

शील का गं ?



तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य ,मी परत आनिल का ग ?
तुझ्या सहवासात प्रिये, हे आयुष्य काढील का गं ?

उभा राहुनी रस्त्यावरती, वाट पाहतो तुझी मी 
तुझ्या नाजूक पावलांनी, परत येशील का गं ?

वर्गामध्ये बसुनी मी, न्याहाळतो तुला गं 
एकदातरी कुठे तू, मला दिसशील का गं ?

सगळे आले इथे पर, चाहूल ना तुझी ती 
त्या लाजल्या नजरेचा, इशारा देशील का गं ?

हा असा तुझा दुरावा, मी सहन कसा करावा 
मी नाराज आहे तुझ्यावर, मला मनवशिल का गं ?

आता खूप दिवस झाले, ना पाहिला तो चंद्र 
तुझ्या आनंदी चांदण्यात, मला नेशील का गं ?

या गर्दीत मुलांच्या, किती शोधू तुला मी 
एकदातरी प्रिये नजर चोरटी देशील का गं ?

बांध फुटला अश्रूंचा, डोळा आवरेना पाणी 
मग आवर घालायला, एकदा येशील का गं ?

तुझ्याशिवाय माझी अधुरी हि कविता 
ती पूर्ण करण्याला, सोबत येशील का गं ?

   Sagar Dubhalkar 
   ९६०४०८४८४६

और नया पुराने