अहो सरकार,
आतातरी सोडा आम्हाला लुटण्याचा धंदा
पाऊसच कमी पडला शेतावर माझ्या यंदा
दिसाल भाव म्हणून निवडलं होत तुम्हाला
घेसाल आमचा जीव असं वाटलं नव्हतं आम्हाला
फुकट भावामध्ये विकला हो आम्ही कांदा
आतातरी सोडा आम्हाला लुटण्याचा धंदा
मुलगी आली लग्नाला, पैसे नाहीत खिशात
शरम वाटली मला, दोरी घेऊन गेलो शेतात
आईशपथ या वर्षी मी विषही प्यालो दोनदा
आतातरी सोडा आम्हाला लुटण्याचा धंदा
मुलगा म्हणतो दररोज, शाळेत जायचं मला
आता काय विकून शाळेचा कापड आणू त्याला
रडलो मी किती वेळा आणखी रडू मी कितींदा
आतातरी सोडा आम्हाला लुटण्याचा धंदा
पाऊसच कमी पडला शेतावर माझ्या यंदा