महाराष्ट्र सरकारने सातबारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे । बघा कोणते निर्णय आहेत
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासंबंधीचा शासन निर्णय २ सप्टेंबर २०२० रोजी प्रशिध्द करण्यात आला आहे. कोणते आहेत ते बद्दल जाणून घेऊया.
१. गाव नमुना ७ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजे लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी टाकण्यात येणार आहे.
२. लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.
३. शेती क्षेत्रासाठी 'हेक्टर आर चौरस मीटर ' हे एकक वापरण्यात येणार असून विनशेती क्षेत्रासाठी 'आर चौरस मीटर ' हे एकक वापरण्यात येणार आहे.
४. यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बीजे, ई - कराराच्या नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून त्यांना खोदलेले दाखवण्यात येणार आहे.
५. जे फेरफार राहिलेले आहेत ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून नोंदवण्यात येणार आहे.
६. दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा काढण्यात येणार आहेत जेणेकरून खातेदाराची नावं स्पष्टपणे दिसतील.
७. गतक्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.
८. बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यातील शेतजमिनीच एकक 'आर चौरस मीटर ' राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.
९. बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी 'सदरची क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यक नाही ' अशी सूचना देण्यात येणार आहेत.
अशाप्रकारे (७/१२) सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. महत्वाची माहिती आहे इतरांनाही share करा.