ते पक्षी दोन
थाटली कोणी हि दुनिया
अन साक्षी कोण होते
पंखात घालुनी पंख
ते पक्षी दोन होते
सामसूम होतं सारं
नव्हती कुठे चिवचिव
निश्चिन्त त्या जीवाला
नव्हती कशाची हाव
मनात गुंतलं मन
जीवात जीव जडला
ह्या प्रेमापायीच त्यांच्या
इतिहास सारा घडला
तिच्यासाठी आता तो
शोधू लागला चारा
त्याचा जीव नगण्य
तिचा जीव प्यारा
आता तीही त्याला
गोड गोड लागली बोलू
मऊ मऊ शुभ्र पंख
गळ्यात लागली घालू
दुनियेत त्या आधीच्या
किती नक्षी छान होते
पंखात घालुनी पंख
ते पक्षी दोन होते
Tags:
Stories/Poems