अंतरीचे बोल

ते छान गुलाबाचे फुल 
मला पण हवं होतं  
हे मला माहित नव्हतं 
कि ते दुसर्याने जिंकलं होतं 

मी पाहिले जेंव्हा त्याला 
ते मनापासून आवडले मला 
पण खुप उशीर झाला 
त्याला आपलं करण्याला 

त्या सर्व बागेमध्ये 
ते एकच उठून दिसत होत 
म्हणून बागेत येणारा प्रत्येकजण 
त्यालाच न्याहाळत होत 

त्या फुलाला बिचाऱ्या 
हे काहीच कळलं नव्हतं 
कोण परकं आहे 
आणि कोण आपलं होत 

शेवटी मीच विचार केला 
नको ते फुल आपल्याला 
संघर्ष दोघांचा पाहून 
काय वाटेल त्या फुलाला 

त्यागून त्या फुलाला 
मी आज झुरतो आहे 
स्फूर्ती त्याच फुलांच्या 
आजही गोंजारतो आहे 
और नया पुराने