फुलणाऱ्या फुलांनी

फुलणाऱ्या फुलांनी 
फूलन कधी सोडायच नसत 
एका दिवसाच आयुष्य म्हणून 
पाकळी बनुन रडायच नसत 

फुलणाऱ्या फुलांनी 
स्वतःसाठी फुलायच नसत 
आपला त्यात स्वार्थ  साधुन 
गर्वामधे झुलायच नसत 

फुलणाऱ्या फुलांनी 
आपल काहि समाजयच नसत 
आपला सुगंध दुसऱ्यास देऊन 
सुख त्यात मानायच असत 

फुलणाऱ्या फुलांनी 
अपेक्षा कश्याची करायची नसते 
स्वतःजवळ सर्वकाही मानून 
तेच दुसऱ्याला द्यायच असत 

फुलणाऱ्या फुलांनी 
एकट कधी राहायचं नसत 
आपला सहवास दुसऱ्यास देऊन 
त्याच दुःख वाटायचं असत

फुलणाऱ्या फुलानी 
स्वतःला कधी जपायच नसत 
मला तुझ्याकडे पाहताना 
चोरुन चोरुन लपायच नसत 

और नया पुराने