ह्या 3 गोष्टी पाळा, Instagram द्वारे पैसे कमवा | Earn from Instagram 2023

 ह्या 3 गोष्टी पाळा, Instagram द्वारे पैसे कमवा | Earn from Instagram 2023



तुमच्यापैकी किती लोक facebook किंवा instagram चा उपयोग करतात? खर खर सांगा, जवळपास सगळेच.

बरोबर???

बर तुम्ही दिवसभरात किमान किती वेळ instagram किंवा facebook वर reels बघण्यात घालवता?

जवळपास एक ते दोन तास तरी दिवसाचे !

बरोबर????

बर आता मला सांगा कि तुमच्यापैकी किती लोकांना instagram किंवा facebook ने पैसे दिलेले आहेत?

एकाला हि नाहीत, बरोबर ना?

मग कशाला फुकट त्यावर वेळ वाया घालवता? पाण्यात टाका त्या मोबाईल ला!

थांबा थांबा, लगेच टाकायला लागलात?

मला माहित आहे, मी सागितलं म्हणून लगेच तुम्ही कशाला पाण्यात टाकसाल, आणि पाण्यात टाकायचीही गरज नाहीये,

आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही जर तुमच्या रोजच्या वापरत आणून, अंमलबजावणी केली, तर पुढच्या सहा महिन्यापासून तुम्हीही आपल्या instagram आणि facebook च्या माध्यमातून पैसे कमावत असणार.

तुम्ही म्हणाल “खरच?”

तर मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो कि नक्कीच, फक्त तुम्हाला त्यासाठी पुढील सहा महिने, मी ह्या ब्लोग मध्ये सांगितलेल्या मार्गाने काम करत राहायचे आहे,

मी तुम्हाला instagram द्वारे कोण कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकता हे तर सांगणारच आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला काय कराव लागणार आहे ते सांगेल.

तुम्ही ज्या प्रकारे एखाद्या नोकरीसाठी काही महिने, वर्षे अभ्यास करता, तयारी करता. तशी तयारी तुम्हाला इथेही करावी लागेल,

मेहनत कराल तरच फळ मिळेल.

एक मात्र नक्की सांगतो कि, इथे तुम्हाला कुठेही पैसे गुंतवायचे नाहीत, कोणालाही पैसे द्यायचे नाहीत, MLM सारखे चार लोक घेऊन यायचे नाहीत. काहीच करायचं नाही मग पैसे कसे मिळतील.

सांगतो. थांबा, हा ब्लॉग मी एकदम सविस्तर लिहिणार आहे, कारण मला केवळ माझा ब्लॉग वाचून लोकांनी time pass करावा एव्हढा उद्देश नाही, तर माझ्या ब्लॉग चा तुम्हालाही फायदा व्हावा हा आहे.

मी २०१५ पासून YouTube, Facebook, Instagram, Website, App Development अशा माध्यमातून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो ह्याचा अभ्यास करत आलेलो आहे, आणि मीही बऱ्याच गोष्टी करून बघितल्या आहेत.

शेवटी ज्या ज्या गोष्टीतून खरे खुरे पैसे कमवू शकतो हे कललेल आहे आणि ते मीही स्वतः अंमलबजावणी करत आहे.

मी एक भारत सरकारचा फुल time नोकर आहे, अर्धा लाखापेक्षा जास्त मला सरकार पगार देत, तरीही मी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, आणि करत आहे कारण इथे काम करण्यासाठी कोणत्याही वेळेची मर्यादा नाही, कोणत्याही office ची गरज नाही, कोणत्या बॉस ची गरज नाही, फ्री मध्ये आपल्या वेळेनुसार, आवडीनुसार काम करायचं आहे.

त्यामुळे मी माझ office च पूर्ण काम करूनही माझ्या ह्या आवडीच्या छंदाला वेळ देतो आणि माझा छंद मला त्या बदल्यात मला पैसे देतो.

इथे तुम्हाला यशस्वी होण्यसाठी वेळ जरूर लागतो परंतु एकदा जर तुम्ही या क्षेत्रात यशस्वी झालात तर तुमच्यापुढे, डॉक्टर, इंजिनिअर, आमदार, खासदार सगळे झक मारतात.

फक्त वेळ द्यावा लागेल, संयम ठेवावा लागेल, मेहनत करावी लागेल, रोज नवीन शिकून, अमलात अणाव लागेल.

आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला instagram बद्दल पूर्ण विश्लेषण करणार आहे, येत्या ब्लॉग मध्ये वर सांगितलेल्या सर्व माध्यमाद्वारे तुम्ही कशाप्रकारे पैसे कमवू शकता ह्या बद्दल सांगणार आहे, त्यामुळे आपले येणारे सर्व ब्लॉग सुद्धा वाचायला विसरू नका,

कारण सगळे ब्लॉग वाचल्याशिवाय तुम्हाला तुमचा विषय, किंवा कोणत्या क्षेत्रात तुम्ही चांगले काम करू शकता हे कळणार नाही.

आता आता प्रस्तावना खूप झाली, चला सविस्तर विषयाला हात घालू.

 

instagram आपल्याला पैसे देत का:

सध्याच्या घडीला तरी instagram भारतात पैसे देत नाही, Youtube ज्या प्रकारे आपल्याला पैसे देत त्याप्रकारे instagram ने आत्तापर्यंत भारतात सुरु केलेलं नाहीये, परंतु बाहेर देशात सध्या instagram ने प्रायोगिक तत्वावर प्रसिद्ध Insta Star ह्यांना Bonus स्वरुपात पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे.

लवकरच हे भारतातही सुरु होण्याची शक्यता आहे कि instagram direct आपल्या users ना पैसे द्यायला सुरुवात करेल. परंतु त्याला काही अटी असतील त्या नंतर आपल्याला कळतीलच.

 

पैसे मिळवण्यासाठी instagram वर आपल्याला काय कराव लागत.:-

instagram हा एक facebook  सारखाच Social platfarm आहे, जो कि facebook चाच एक मोठा भाऊ आहे असच म्हणता येईल, कारण facebook आणि instagram ह्यांची parent Company एकच आहे ती म्हणजे META. ह्याच कंपनीला अगोदर facebook असे म्हणत.

instagram हे स्वतः आपल्याला काहीही पैसे देत नाही, तर आपण instagram द्वारे Sponsorship, Affiliate Marketing, Product and Service Selling, Brand Partnership ह्या मार्गाने पैसे कमवू शकतो.

त्याच बरोबर थोड्याच दिवसात Youtube सारखे Videos Monetize करूनही पैसे मिळवू शकू.

बर वर सांगितल्या प्रमाणे Sponsorship, Affiliate Marketing, Product and Service Selling, Brand Partnership ह्या प्रकारे सर्वच लोकांना पैसे कमावता येतात का?

तर नाही!

तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या Profile वर जास्तीत जास्त Followers लागतात.

मग followers कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न आहे, आणि हा जर तुमचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला तर insta star झालात म्हणून समजा.

मग आपल्याला सर्व वेळ द्यायचा तो हे शोधण्यासठी कि followers कसे वाढवायचे????

कितो सोप आहे, जो दिसेल त्याला सांगायचं, मला follow कर म्हणून, किंवा माझ्या page ला follow कर म्हणून. बरोबर ना!

नाही, बिलकुल नाही.

कोणाला follow करा म्हटल्याने ते आपल्याला follow तर करतील, परंतु ते आपले dead followers असतील, त्यांचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही,

आपल्याला हवेत जिवंत followers, जे आपल्या profile ला, आपल्या page ला response देतील, आणि ह्याच followers च्या जीवावर तुम्ही मोठे होऊ शकता.

ह्या साठी तुम्हाला तुमच्या followers ना आवडेल अशा गोष्टी आपल्या page वर share कराव्या लागतील.

 

म्हणजे नेमकं काय करायचं?

आपण instagram वापरतो तो साधारणतः आपला personal profile असत. जर तुम्ही कलाकार आहात, reels बनवू शकता, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या profile वरून direct तुमच्या followers ना connect होऊ शकता, परंतु हे तुम्हाला जमत नसेल तर इतर काय मार्ग आहेत ते बघू.

तुम्हाला reels बनवता येत नाहीत, तुम्हाला काही कलाकारी जमत नाही, तुम्ही actor नाही आहात, तुम्ही dancer नाही आहात, तुम्ही विनोद करू शकत नाहीत, तरीही तुम्ही instagram वरून पैसे कमवू शकता.

 

मग मी काय करू??

एक काम करा. तुम्हाला काहीतरी आवडत असेल, जस कि प्राणी, पक्षी, मांजर, कुत्रा, हत्ती, घोडा, जंगली पक्षी, पेंटिंग, actor, सन्नी लेवनी...........................किसके मन मी लड्डू futte. बर फुटू देत, हरकत नाही,




वरील चित्रामध्ये तुम्ही बघू शकता कि एकजण फिटनेस बद्दल पोस्ट करत आहे तर दुसरा मांजरी चे फोटो टाकतो, तरीही त्यांच्या page वर एका लाखापेक्षा जास्त followers आहेत.

तुम्हाला जे काही आवडत असेल त्या विषयावर एक page बनवा,

कोण म्हटली कस बनवू म्हणून?

कोण म्हटली??

अग बाई, खूप सोप्प आहे, नाहीतर youtube ला जा, तिला विचार कस बनवू, ती youtube लगेच सांगेल, तिला माझ नाव संग.....हा हा हा !

आता एकजण म्हटला कि सर तुम्ही वर सांगितलेली एकही गोष्ट मला आवडत नाही, मग मी कशावर page बनवू.

बबड्या तू एक काम कर, तुला हॉटेल मध्ये जावून चमचमीत खायला आवडत का?

हो सर, खूप,

मग जे खाशील ते खायच्या अगोदर फोटो खाडून टाक, नाहीतर इंटरनेट वर कुठून तरी शोधून, त्याला योग्यप्रकारे एडिटिंग करून टाक.



सर हे तर किती सोप्प आहे, असपण चालेल?

भावड्या सगळ चालत, फक्त आपल डोक वेळेवर चालाल पाहिजे, परंतु एक लक्षात ठेवा कि दुसऱ्याच्या गोष्टी जशाच्या तशा तुम्ही नाही वापरू शकत, त्यात तुम्हाला योग तो बदल करावा लागेल, आणि तो कसा करायचा हे तुम्ही शोधा, सगळ मीच सांगू का?

तेही सांगतो, पण ह्या ब्लॉग मध्ये नाही, कधीतरी!

 

तर विषय काय चालू होता, कि एक page बनवा.



शक्यतो page  एकच विषयावर बनवा. त्या page वर एकच प्रकारचे posts share करत रहा. लोकांना आकर्षित करतील अशा posts करा, योग्य ते captions द्या, tag द्या.



तुम्हाला साधारणतः एक पोस्ट एडीट करायला आणि upload करायला जास्तीत जास्त ५ मिनिट लागतील. परंतु लक्षात ठेवा, एडीट आणि upload करायला जरी ५ मिनिट लागत असतील, परंतु कोणती टाकायची आणि ती perfect आहे का हे ठरवायला किमान अर्धा तास घ्या.

दिवसातून किमान ३ तरी posts करा, त्यामुळे तुमचे followers तुमच्याशी जास्त connect होतील आणि instagram ला सुद्धा कळेल कि तुम्ही active आहात.



तुम्ही active राहिलात तर तुमच account active राहील, तुमच account active राहील तर तुमचे followers वाढत राहतील.

ह्या काळात तुम्हाला mail येतील, whatsapp message येतील कि आम्ही तुमचे followers वाढवून देऊ, परंतु आपल्याला केवळ खरे खुरे followers मिळवायचे आहेत.

आणि ते मिळवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आपल्या page वर काम करत राहणे.

 

आता बघूया आपण कोण कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकतो.

Sponsored Posts: तुमच्याकडे पुरेशे followers आहेत, त्याच बरोबर तुम्ही रोज तुमच्या followers ना engage ठेवत असाल तर Product कंपनी किंवा इतर कंपन्या तुम्हाला त्यांच्या product किंवा services ची पोस्ट तुमच्या instagram account वर करायला सांगू शकतात.

ह्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून पैसे आकारू शकता.

पैसे किती आकारायला हवेत हे तुमच्या followers आणि त्या product वर अवलंबून असते. ह्या प्रकारचे कुठेही रेट ठरलेले नसतात, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायचे असतात.

अशाप्रकारे तुम्ही Sponsored posts द्वारे हि पैसे कमवू शकता.

Affiliate Marketing: सध्याच्या घडीला influncer लाखो रुपये Affiliate Marketing द्वारे कमावत आहेत.

Affiliate Marketing म्हणजे अशी एक गोष्ट कि तुम्ही एखाद्या कंपनीचे product किंवा service ह्यांच्या विषयी post करू शकता, त्या बदल्यात तुम्हाला एक Affiliate लिंक मिळते, ज्याद्वारे तुमच्या followers नी एखादी वस्तू खरेदी केली तर त्या बदल्यात तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचे कमिशन मिळते.

ते वेग वेगळ्या product वर वेग वेगळे असू शकते. त्याच बरोबर अशा अनेक कंपन्या हि आहेत ज्या अशाप्रकारचे कमिशन ऑफर करत आहेत जसे कि, Amazon, Flipkart, Cuelink, Clikbank, Bluehost, Godaddy.

अशा अनेक कंपनीज आहेत ज्या आपल्या product वर कमिशन देत आहेत. त्या तुम्हाला google केल्यावर मिळून जातील.

Sell products or services: 

तुमच्याकडे पुरेशे followers असतील तर तुम्ही तुमचा एखादा product किंवा service सुधा विकू शकता. ह्यामध्ये physical products, digital products, किंवा services सुद्धा असू शकतात.

 

सध्या बरेच influncer आपण कशा प्रकारे आपल्या instagram, youtube आणि इतर प्रकारात प्रगती केली ह्यावर ebook लिहितात, आणि ते आपल्या instagram page च्या माध्यमातून विकून पैसे कमावतात.

बरेच लोक आपले Video course बनवतात आणि तेही ह्या द्वारे विकून पैसे कमावतात.

Brand partnerships: 

Brand partnerships म्हणजे तुम्ही एखाद्या product वर तुमच page चालवत असाल, जसे कि तुम्ही तुमच्या page वर जर केवळ बेस्ट हेडफोन वर पोस्ट करत असाल, तर तुम्ही असे हेड फोन बनवणाऱ्या कंपनीशी Brand partnerships करू शकता.

ह्या बदल्यात तुम्ही त्या तुमच्या पोस्ट मध्ये कधी कधी त्या कंपनीचे हेड फोन ची पोस्ट करू शकता, ह्या बदल्यात त्या कंपनीला Buyer मिळतात आणि ह्या बदल्यात तुम्ही अशा कंपनीकडून पैसे आकारू शकता.

 

ह्या प्रकारामध्ये sponsored posts, giveaways, or takeovers ह्या गोष्टी येतात.

 

Sell your photos: 

तुम्हाला जर फोटोज काढण्याचा छंद असेल, किंवा तुम्ही फोटो ग्राफर असाल तर तुम्ही तुमच्या page वर अशा प्रकारचे फोटो टाकू शकता.

जर तुमचे फोटोज खरच atractive असतील तर बऱ्याच अशा कंपनीच किंवा website असतात ज्या फोटो विकत घेतात. किंवा बरेच लोकही असतात ह्यांना फोटो ची आवड असते, जर अशा प्रकारचे फोटो तुमच्याकडे असतील तर असे लोक ते विकत घेतील.

 

लक्षात ठेवा instagram द्वारे फक्त कष्ट करण्याची तयारी असणाराच कमाई करू शकतो. त्यासाठी वर सांगितल्या प्रमाणे तुम्हाला तुंच्या followers शी connect रहावं लागेल, तुमच्या followers ना आवडेल असा content create करावा लागेल.

रोज तुम्ही आपल page update केल तरच तुमच्या page ची प्रगती रोज वाढेल. त्याचबरोबर तुमची तुमच्या followers सोबत engagement वाढेल.

आपण जशी पैसे कमावण्याची अपेक्षा करतो, तशी प्रत्येक व्यक्ती करतो, त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्याकडून समोरच्या पार्टी ला फायदा होणार


असेल तरच ते तुमच्यावर पैसे खर्च करतील,आणि त्यासाठी आपल्याला आपला रिपोर्ट दाखवावा लागतो.



जर तुमच्याशी कोणतीही व्यक्ती व्यवहार करू इच्छित असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडून तुमचे सर्व रिपोर्ट मागवून घेईल, त्यावेळी तुमचे सगळे रेपोर्ट चांगले दिसले पाहिजे, तुम्ही मागच्या २८ दिवसात किती लोकांपर्यंत पोचलात, तुमच्या instagram ची पोस्ट किती लोकापर्यंत पोचती, किती लोक बघतात, किती like करतात ह्या गोष्टी इथे परिणामकारक ठरतात.

और नया पुराने