नाही नाही म्हणता म्हणता

नाही नाही म्हणता म्हणता 



नाही नाही म्हणता म्हणता
खूप दूर गेलीस तू
जवळ नाही आली परंतु
स्वप्न मात्र आलीस तू

नभी तुटलेल्या ताऱ्यासंगे
दूर तुटून गेलीस तू
 जवळ नाही आली परंतु
स्वप्न मात्र आलीस तू

मंद सुगंध फुलांमध्ये 
धुंद होऊन गेलीस तू 
जवळ नाही आली परंतु
स्वप्न मात्र आलीस तू 

दूर जरी जाशील माझ्या 
पण सावली मात्र झालीस तू 
जवळ नाही आली परंतु
स्वप्न मात्र आलीस तू 

दगड होऊन काळजावर माझ्या 
दगड ठेऊन गेलीस तू 
जवळ नाही आली परंतु
स्वप्न मात्र आलीस तू 
 
और नया पुराने