दुरावा प्रेमाचा

दुरावा किती देशील तू 
दूर कशी होशील तू ?
हळहळत्या हृदयाला माझ्या 
शांत कशी करशील तू 

काय सांगू तुझ्यासाठी मी 
किती सोंग मांडले 
तुझ्या प्रेमापायी 
किती अश्रू सांडले 

आता तरी समजून घे 
भाव माझ्या मनाचे 
काही क्षण देशील का?
तुझ्या या जीवनाचे 

का पडावा विसर तुला 
अगं माझ्या ग प्रेमाचा 
का खेळ मांडला 
माझ्या ग जीवनाचा 

क्षण क्षण तळपते मन 
तुझ्या आठवणीने 
दे जरासा दिलासा 
तुझ्या या नयनाचा 
और नया पुराने