कशाला

झोपलेल्या मनांना उठवायचं कशाला 
आठवलेल्या शब्दांना विसरायचं कशाला 
खूप मुश्किलन मिळत जीवनात कोणीतरी 
मग त्यांनाच पुन्हा पुन्हा फसवायचे कशाला 

दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायचं कशाला 
मनातल्या शब्दांना घोळायचं कशाला 
प्रेमाने साध्य होत काहीही जगामध्ये 
मग मन दुखवून कोणाला जाळायचा कशाला 

चालणाऱ्या पावलांना थांबवायचं कशाला 
झालेल्या कराराला लांबवायचं कशाला 
होणार काम होत असत हळूहळू 
मग ओरडून कोणावर झोम्बवायचं कशाला 

चेहऱ्यावरील भावनांना लपवायचं कशाला 
आपल्यावरील अन्यायाला पचवायचं कशाला 
हे जीवन जगावं वर करून ताठ मानेन 
लाजून लाजून स्वतःलाच खपवायचं कशाला 
और नया पुराने