आठवण येते क्षणाक्षणाला
आवरू कसं मनाला?
सांगू आता कोणाला?
तुझी आठवण येते म्हणून ......
वेड लागला तुझं
हरवलं भान माझं
उतरवू कसं ओझं
मनातल्या भावनांचं
झोपही येत नाही
विचारही थांबत नाही
मनही लागत नाही
तुझ्यावाचून .....
आठवून तुझे शब्द
झालो मी स्तब्द
ओठही निःशब्द
तुझ्यामुळे .....