आज दिसले नयनात तुझ्या

आज दिसले नयनात तुझ्या 
भाव माझ्या प्रेमाचे 
ओठावरी तुझ्या सखे ग 
आले गीत माझ्या जीवनाचे 

ओठ पाकळ्या तुझ्या सखे ग 
फुलून फुल झाले 
पाहून माझे मन सखे ग 
हरवून आज गेले 

गालावरी तुझ्या लाजले 
हास्य तुझ्या लाजले 
का लाजलीस अशी तू 
आता भय इथे कोणाचे 

चोरटी नजर प्रिये तुझी 
थेट भिडते काळजाला 
क्षणभर का होईना 
दिलासा मिळतो या मनाला 
और नया पुराने