तात्पुरत्या समस्येवर
आत्महत्या हा उपाय नसतो
जीवनाचा खरा आनंद
संघर्ष करून जगण्यात असतो
आई बाबांचे विसरून उपकार
स्वार्थ आपला पाहायचा नसतो
लहानाचे मोठे केले आपल्याला
त्यांचा मान ठेवायचा असतो
म्हातारपणाचा आधार त्यांचा
आपल्याला बनून राहायचे असते
मध्येच त्यांचा हात सोडून
पक्षी बनून उडायचे नसते
आईचा पदर सोडून
आकाशाची चादर ओढायची नसते
बापाच्या अंगाचा घाम पाहून
वेगळाच मार्ग काढायचा नसतो