तुझ्यापासून दूर गेल्यावर

दूर गेल्यावर तुझ्यापासून कि ,
आठवण तुझी क्षणाक्षणाला येईल 
झोपही येणार नाही आठवणीने तुझ्या 
मग उगच अंगावर चादर ओढून घेईल 

काहीतरी हरवल्यासारखं  वाटेल 
मनात मात्र काहूर माजलेलं  असेल 
 भास होईल तुझा तुझा मात्र 
जवळ माझ्या कुणीच नसेल 

दररोज तुझा आवाज ऐकायला 
कां माझे आतुर होतील 
पूर्वी बोलले शब्द तुझे 
काळजाला माझ्या चाटून जातील 

इच्छा होईल तुला भेटण्याची 
पण कारण मला सापडणार नाही 
मग झोपेतच बडबडेन काहीतरी 
पण डोळे मात्र उघडणार नाही 

दिवस वाटेल वर्षासारखा 
अन मिनिटही वाटेल महिन्यासारखा 
एकही क्षण राहणार नाही 
मला भरभरून जगण्यासारखा

तुझे शब्द कानात गुंजतील 
तर चेहरा माझ्या डोळ्यात राहील 
मग मनाला माझ्या समजवायला 
उगच फिरायला मळ्यात जाईल 

खरंच प्रिये तुझी आठवण 
दररोज मला होईल 
आठवणीचा एक क्षण म्हणून 
एक अश्रू डोळ्यांतून गालावर येईल 
और नया पुराने