जीवनाच्या मंद झुल्यावर

जीवनाच्या मंद झुल्यावर 



जीवनाच्या मंद झुल्यावर 
धुंद होऊन झुलत बसू नको 
जागा होऊन सतर्क राहा 
दुसऱ्यांच्या गोष्टीवर झुलत बसू नको 

स्पर्धेशी स्पर्धा करताना 
नुसतं पळत बसू नको 
आणि एका अपयशापायी 
स्वतःला छळत बसू नको 

जगायचं  असेल तर 
जिवंत होऊन जग 
स्मशानातल्या मङयाप्रमाणे 
मनाला जाळत बसू नको 

तळहातांवरल्या रेषांवर 
भविष्य पाहत बसू नको 
जगतोय तर भरभरून जग 
आयुष्य वाहत बसू नको 

दगडाच्या जगात राहताना 
मन तुझं पाषाणी असू दे 
दीन दुबळ्यांसाठी डोळ्यांत तुझ्या 
अश्रूंचं पाणी असू दे 

इमारतींची जंगले वाढली तरीही 
झोपड्यांची कुरणे तशीच आहेत 
भिकाऱ्यांच्या भिकारीपणाची 
गोष्ट तुझ्या कानी असू दे 

 
और नया पुराने