माझा शिवबा

कुठे माझा शिवबा 
आणि कुठे आजचे नेते आहेत 
काळं तोंड लपवण्यासाठी 
ह्यांचे शंबर ठिकाणी खाते आहेत 

रूप माझ्या शिवबाचं 
आताही माझ्या डोळ्यात आहे 
लाज वाटुद्यावि ह्यांनी 
ज्यांचं लक्ष "आदर्श" घोटाळ्यात आहे 

शिवबा तुझ्या कर्तृत्वाचा 
डोळ्यात एक एक किस्सा आहे 
देशाच्या या भ्रष्टाचारात 
नेत्यांचा एक एक हिस्सा आहे 

खरंच सांगतो शिवबा 
तुमच्या नखाचीही याना सर नाही 
शपथ घेतो कायद्याची 
पण कायद्याचाच ह्यांना डर नाही 

खाऊन खाऊन पोट ह्यांचे 
राजनासारखे होऊन गेले 
वर थोबाड करून म्हणतात पुन्हा 
आम्ही केंव्हा घोटाळे केले 

कोणाची हि "पृथ्वी"
आणि कोणाचे हे "राज" आहे 
आजही आम्हा मराठ्यांना 
शिवा - संभावर नाज आहे 
और नया पुराने