तो:- मी एकटाच बसलो सजणी सोबतीला तू येना
ती:- करू नको मस्करी सजना मंत्रमुग्ध होना
तो:- सुगंध हा फुलांचा रानाराणात पसरला
ती:- तू थांब जरा रे पाय माझा घसरला
तुला पाहताच सजना अंधारही ओसरला
मी साद देते तुजला , तू साद मजला देना
करू नको मस्करी सजना मंत्रमुग्ध होना
ती:- का झाला रे नाराज, गीत घेऊन मी आले
सुख लोळतया पायी , दुःख सारे पळाले
तो:- हि तुझी ग किमया, झाड बहरून आले
तुला पाहून सजनी, चराचर बहरून आले
मी हात देतो तुजला, तू हात माझा घे ना
मी एकटाच बसलो सजनी, सोबतीला तू ये ना
तो:- सांजवेळ झाली, सूर्यही बुडाला
बघ पाखरांचा थवा , घरट्याकडे निघाला
ती:- लाली त्या रवीची कशी आकाशी सांडली
मातेनेही हिरवी माया आम्हावर मांडली
जन्मभर साथ देईन, शपथ आज घेना
करू नको मस्करी सजना , मंत्रमुग्ध होना
