कुणाजवळ तक्रार करावी
आणि कोणाला दिलासा द्यावा
कोणाचा हात खट्याळपणे
आपल्या हातात घ्यावा
नशिबाने साथ आणि
मनाने साद दिली नाही
परमेश्वराने ही म्हणूनच
मला हाक दिली नाही
मला जगण्यासाठी
एक सहारा हवा होता
मला काठावर येण्यासाठी
एक किनारा हवा होता
जाळ्यात तर फ़सलोच होतो
फक्त तुझीच कमी होती
प्रीती तर सर्वच लुटली तुझ्यावर
फक्त प्राणाची कमी होती
सागर दुभळकर
९६०४०८४८४६