अस्मिता

मराठीची घेऊन अस्मिता 
जेंव्हा पेटून मी उठलो 
पौर्णिमेच्या ताऱ्यासम 
नभातून एकटाच तुटलो 

मातेच्या या रक्षणाची 
आज मी शपथ घेतली 
तिच्या लेकराच्या मनात 
अस्मितेची ज्योत पेटली 
ज्योत घेऊन हातामध्ये मी 
प्रकाश वाटत जो सुटलो 
पौर्णिमेच्या ताऱ्यासम 
नभातून एकटाच तुटलो 

आजतोवर आम्हा इथे 
जे काही मिळाले आहे 
गोडीने नाहीतर 
झगडून मिळाले आहे 
माझ्या दारी, माझ्याचसाठी 
जेंव्हा स्वातंत्र्यास झटलो 
पौर्णिमेच्या ताऱ्यासम 
नभातून एकटाच तुटलो 

पूर्वीपासूनच या मातेच्या 
रक्षणासाठी पाऊल उचलले 
अन्याय इथे आम्हांवरले 
कोणीतरी झुगारून लावले
राजेंच्याचं प्रांतात राहून जेंव्हा 
"शिवाजी महाराज कि जय" म्हटले 
पौर्णिमेच्या ताऱ्यासम 
नभातून एकटाच तुटलो 

और नया पुराने