स्वप्न माझ सागर व्हायचं

एक स्वप्न आहे माझ 
ते का दुसऱ्याला सांगायचं 
त्याला कुंपण लाऊन विचारायचे 
मेहनतीने जापायचे    

मी थेम्ब पाण्याचा 
स्वप्न माझ सागर व्हायचं 
प्राप्ति नसते सर्वाना 
तरीही मार्गी त्याच राहायचं 

दिवसामागून दिवस जातात 
नाही राहणार दुःखाचे 
तू फ़क्त चालत रहा 
दिवस येतील रे सुखाचे 
और नया पुराने