कुणब्याचा पोर

शेतकरी दादा माझ्या 
जाग आता जाग आता 
किती शतके राहतो मागे 
जाग आता जाग आता 

पुऱ्या झाल्या आत्महत्या तुझ्या 
तुझ्या मनगटात जोर 
भिऊ नको भाऊ तू रे 
आहेस कुणब्याचा तू पोर 

धरणीमाता आई तुझी 
पिता झाला रे आकाश 
एवढे सामर्थ्य तुझ्यामध्ये 
मग का घेतोस तू फास 

बळीराजा म्हणतो तुला 
सारा जग रे आज 
तुझे स्वातंत्र्य मागण्यासाठी 
का धरतोस मनी लाज ?

माणसाची माणुसकी गेली 
फक्त राहिला माणूस 
फक्त तुझ्याच जीवनाशी 
असं होतया रे कसं ?
और नया पुराने