आज जमा झाले सर्व
येथे झाडावर पक्षी
डोळ्यांत स्वप्न उद्याची
मनात भविष्यांची नक्षी
झेप घेतांना त्या फांदिवर
विसर पडेल या फांदिचा
राजमुकूट मिळेल जरी सोन्याचा
आठवणीचा टोप मनी चांदीचा
आज जरी झाले एकमेकांना
उद्या वेगवेगळ्या त्यांच्या दिशा
विसावा काही क्षणाचा
एक आडवी आहे निशा
ओळख फक्त एका राञीची
जीवनाच्या या प्रवासात
दाणे टिपतांना उद्या
कधीतरी येतील सहवासात
उद्या उडून पक्षी जातील
ठेऊन झाडावर आठवणी
पुर आणून डोळ्यात
झाड आठविल ही कहाणी
येथे झाडावर पक्षी
डोळ्यांत स्वप्न उद्याची
मनात भविष्यांची नक्षी
झेप घेतांना त्या फांदिवर
विसर पडेल या फांदिचा
राजमुकूट मिळेल जरी सोन्याचा
आठवणीचा टोप मनी चांदीचा
आज जरी झाले एकमेकांना
उद्या वेगवेगळ्या त्यांच्या दिशा
विसावा काही क्षणाचा
एक आडवी आहे निशा
ओळख फक्त एका राञीची
जीवनाच्या या प्रवासात
दाणे टिपतांना उद्या
कधीतरी येतील सहवासात
उद्या उडून पक्षी जातील
ठेऊन झाडावर आठवणी
पुर आणून डोळ्यात
झाड आठविल ही कहाणी